पुणेः सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मंत्री धनजंय मुंडे यांच्यावर ते कृषीमंत्री असताना कृती विभागात खरेदी करण्यात काही साहित्यामध्ये भष्ट्राचार झाल्याचा गंभीर आरोप केला होता. या संबधी पत्रकार यासंबंधिचे पुरावे देखील सादर केले होते. तर मंत्री धनंजय मुंडे यांनी दमानिया यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले होते.
यावर परिवहन मंत्री यांना प्रश्न विचारला असता त्यांनी कृषी विभागासाठी केलेली खरेदीची जबाबदारी मुख्यमंत्र्यांवर ढकलून चालणार नाही, त्याची सर्वस्वी जबाबदारी ही पालकमंत्री असलेले तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची असल्याचे एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले होते. तसेच मुंडे यांनी नैतिकतेवर राजीनामा द्यायला हवा अशी भूमिका परिवहन मंत्र्यांनी घेतली. त्यांनी ही उघडपणे भूमिका घेतल्याबाबत मा. मंत्री जितेंद आव्हाड यांनी सरनाईकांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.
धनंजय मुंडे हे कृषी मंत्री असताना कृषी विभागात तब्बल २८५ कोटी रुपयांचा साहित्य खरेदीचा घोटाळा झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केले होता. तसेच त्यांनी ही सर्व खरेदी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहमतीने झाले असल्याचे म्हटले होते. यावर मंत्री प्रताप सरनाईक यांना प्रश्न विचारला असता त्यांनी मुंडे यांनी नैतिकतेवर राजीनामा द्यायला हवा अशी भूमिका मांडली. यावर मा. मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रताप सरनाईक यांचे अभिनंदन केले आहे.
जितेंद्र आव्हाडांची पोस्ट
उघडपणे भूमिका परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतल्याबद्दल त्यांचे अभिनंदन! आपल्या अंगावर आले की दुसर्याच्या अंगावर ढकलून द्यायचे, ही अनेकांना सवय असते. तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भ्रष्टाचाराचे खापर फोडण्याचा प्रयत्न मंत्रिमंडळातील ‘आका’ धनंजय मुंढे यांनी केला आहे. भ्रष्टाचार करायला एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते. उपद्व्याप करायचे यांनी आणि खापर दुसऱ्यावर फोडायचे ; किती जणांवर असे खापर फोडून जाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न करणार? असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.
उघडपणे भूमिका परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतल्याबद्दल त्यांचे अभिनंदन!
आपल्या अंगावर आले की दुसर्याच्या अंगावर ढकलून द्यायचे, ही अनेकांना सवय असते. तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भ्रष्टाचाराचे खापर फोडण्याचा प्रयत्न मंत्रिमंडळातील… https://t.co/An3Q8tuaEg— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) February 5, 2025
अनेकजण उघडपणे भूमिका घ्यायला करतात. पण, प्रताप सरनाईक यांनी उघड भूमिका घेतली नैतिकतेवर राजीनामा द्यावा, असे मंत्रिमंडळातील एका सहकाऱ्याने थेट सुचविले. तरीही, प्रताप सावध रहा !! आतापर्यंत अजित पवार यांचा फोन आला असेल, “प्रताप, शांत बस.!!” अशी पोस्ट जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवरून केली आहे.