Shrinivas Pawar – मी खरंतर दोघांचंही वक्तव्य ऐकले नाही. दोघेही तरुण आहेत. त्यामुळे प्रत्येकाची वेगवेगळी मत आहेत. रोहित आणि जय याचे मत आहे, ती त्यांची इच्छा आहे. अजितदादा म्हणायचे की जय नको याच्यामध्ये पडू, हे चांगलं नाही, शेवटी त्याच्यात काही चूक नाही. तो अजितदादांचा मुलगा आहे. बहुतेक २०२९ मध्ये सुनेत्रा पवार माघार घेतील आणि जय येईल, असे दिसते, अशी सूचक प्रतिक्रिया श्रीनिवास पवार यांनी दिली. श्रीनिवास पवार म्हणाले, २०२९ मध्ये कोणत्या पक्षाची काय परिस्थिती असेल आणि एकत्र कोण लढणार? कोण कोणाच्या विरोधात लढणार? युती होणार, नाही होणार, विलीनीकरण होणार, नाही होणार, तीन वर्ष हा मोठा काळ आहे, आता त्याच्यावर भाष्य करणं मलाही योग्य वाटत नाही, असे सांगून त्यांनी मूळ प्रश्नांना बगल दिली. बारामती विधानसभा मतदारसंघात २०२९ मध्ये पवार विरूध्द पवार अशी निवडणूक रंगणार का, याबाबत अजित पवार यांचे बंधू आणि आमदार रोहित पवार यांचे वडिल श्रीनिवास पवार यांनी भाष्य केले. रोहित पवार आणि जय पवार यांच्या दोघांच्या वक्तव्याकडे तुम्ही कसा बघता या प्रश्नावर उत्तर देताना श्रीनिवास पवार यांनी मत व्यक्त केल्याने चर्चेचा अर्थ सूचक मानला जात आहे. जय पवार हे उभे राहणार असतील तर इथे बारामतीत पवार विरुद्ध पवार असा संघर्ष पुन्हा होऊ शकतो, असे आमदार रोहित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना प्रतिक्रिया दिली होती.यावर ते बोलत होते.