आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील- यड्रावकर यांना मातृशोक

कोल्हापूर : सार्वजनिक आरोग्य, कुटुंबकल्याण, सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या मातोश्री सावित्री (आक्का) शामराव पाटील-यड्रावकर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 82 वर्षांच्या होत्या.
गेल्या दीड महिन्यापासून त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्यावर उपचारही सुरू होते. मंगळवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालविली. त्यांच्या मागे राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर व जयसिंगपूरचे उपनगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर अशी दोन मुले, पाच मुली, जावई, सुना, नातवंडे, परतवंडे असा मोठा परिवार आहे.
राज्यात करोनामुळे लॉकडाऊन असल्यामुळे अंत्यविधीसाठी कार्यकर्त्यांनी गर्दी करू नये असे आवाहान यड्रावकर परिवाराने सोशल मीडियावरून केले होते, त्यामुळे यड्रावकर परिवारातील सदस्य आणि निवडक नातेवाईकांसह उदगाव येथील वैकुंठ स्मशानभूमीत आज सकाळी नऊ वाजता सावित्री (आक्का) यड्रावकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रांताधिकारी विकास खरात व तहसीलदार डॉक्टर डॉ. अपर्णा मोरे धुमाळ अंत्यविधीसाठी उपस्थित होते.





