मंत्री गुलाबराव पाटलांसह आणखी चार आमदार गुवाहाटीत
Updated On:

गुवाहाटी -महाराष्ट्राचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह आणखी चार आमदार बुधवारी आसामच्या गुवाहाटीत दाखल झाले. त्यांच्या समावेशाने शिवसेनेच्या बंडखोर शिंदे गटाचे संख्याबळ आणखी वाढले आहे.
पाटील यांच्याबरोबरच चंद्रकांत पाटील, योगेश कदम, मंजुळा गावित हे आमदार प्रथम गुजरातच्या सुरतमध्ये पोहचले. तिथून ते विशेष विमानाने गुवाहाटीत दाखल झाले. गुलाबराव पाटील आणि कदम हे शिवसेनेचे, तर चंद्रकांत पाटील आणि गावित अपक्ष आमदार आहेत.
शिंदे गटामध्ये सुमारे 40 आमदारांचा समावेश असल्याचे समजते. त्या गटाच्या बंडामुळे शिवसेनेला मोठे खिंडार पडण्याची चिन्हे आहेत. त्यातून महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.





