Dhananjay Munde Wealth । राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)ने आपली पहिली यादी जाहीर केली.त्यात कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना परळीतून महायुतीचे उमेदवार म्हणून तिकीट देण्यात आले. त्यानुसार त्यांनी काल आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अत्यंत साध्या पद्धतीने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान, यावेळी भाजप आमदार पंकजा मुंडे यांच्यासह परळी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, शिवसेना व घटकपक्ष महायुतीचे प्रमुख पदाधिकारी यांची उपस्थिती होते.
पाच वर्षांमध्ये दुपटीने वाढ Dhananjay Munde Wealth ।
धनंजय मुंडे यांनी उमेदवारी अर्ज भरताना त्यांच्या संपत्तीचे विवरणपत्र देखील दाखल केले. त्यानुसार धनंजय मुंडे यांच्याकडे जवळपास 53.80 कोटी रुपयांची संपत्ती आहे. विशेष म्हणजे धनंजय मुंडे यांच्या संपत्तीत गेल्या पाच वर्षांमध्ये दुपटीने वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेल्या शपथपत्रातून ही माहिती समोर आली. धनंजय मुंडे यांनी परळी विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. या दरम्यान दाखल केलेल्या शपथपत्रात संपत्तीची माहिती नमूद करण्यात आली आहे.
15 कोटींची वाहने, दीड किलो चांदी, 23 लाखांचे दागिने Dhananjay Munde Wealth ।
धनंजय मुंडे यांच्याकडे 2019 मध्ये 23 कोटींची संपत्ती होती. तर 2024 मध्ये सादर करण्यात आलेल्या शपथपत्रात 53.80 कोटींची संपत्ती नमूद करण्यात आली आहे. पाच वर्षांमध्ये मुंडेंच्या संपत्ती सुमारे 31 कोटी रुपयांनी वाढली आहे. धनंजय मुंडे त्यांची पत्नी आणि कुटुंबाकडे 53 कोटी 80 लाखांची संपत्ती आहे. मागील पाच वर्षात यामध्ये दुपटीने म्हणजे 30.75 कोटी रुपयांची वाढ झालीय. 2019 मध्ये त्यांच्याकडे 23 कोटींची संपत्ती होती. धनंजय मुंडे यांच्याकडे 15 कोटींची वाहने, दीड किलो चांदी आहे. तर त्यांच्या नावे 15 कोटी 55 लाख 5 हजार 105 रुपयांचे विविध वाहने आहेत. त्यात अगदी टँकर पासून ते बुलेट पर्यंतच्या सात वाहनांचा यात समावेश आहे. सात लाख तीन हजार रुपयांचे 190 ग्रॅम सोने आहे.
धनंजय मुंडे यांच्या विरोधात सुनील गुट्टे मैदानात
धनंजय मुंडे यांनी 2019 च्या वचननाम्यातील शब्द पाच वर्षात पाळले नाही. मंत्री पदाचा फायदा फक्त वैयक्तिक झाला. धनंजय मुंडे मंत्री म्हणून फेल झाले, असा घणाघाती आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते सुनील गुट्टे यांनी केलाय. शेतकरी संवाद यात्रेच्या समारोप प्रसंगी पत्रकार परिषदेत ते बोलत होते.