मंत्री आदित्य ठाकरे यांच्या ताफ्याला अपघात
Updated On:

सिंधुदुर्ग – राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात झाला आहे. ताफ्यातील एका गाडीने अचानक ब्रेक लावल्याने पाठीमागील गाड्या एकमेकांवर आदळून हा अपघात घडला. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. आदित्य ठाकरेही सुखरुप असून ताफ्यातील वाहनाचे मात्र नुकसान झाले आहे. मुंबई – गोवा महामार्गावर खारेपाटण चेक पोस्ट जवळ ही घटना घडली.
आदित्य ठाकरे कोकण दौऱ्यावर असताना ही घटना घडली आहे. ते आपल्या नियोजीत दौऱ्यानुसार सिंधुदुर्ग येथून रत्नागिरीला निघाले होते. या वेळी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास त्यांचा ताफा खारेपाटण चेक पोस्ट जवळ पोहोचताच ताफ्यातील एका वाहनाने अचानक ब्रेक लावला. त्यामुळे त्याफ्यातील पाठीमागील भरधाव गाड्या एकमेकांना धडकल्या. या घटनेत 2-3 वाहनांचे नुकसान झाल्याची माहिती आहे.





