खाणीतल्या स्फोटात सर्व कामगारांचा मृत्यू; व्यक्त करण्यात आली भीती

तेहरान : इराणमधील कोळशाच्या खाणीत झालेल्या स्फोटानंतर खाणीतल्या सर्व कामगारांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होते आहे. यामुलळे तबास भागात झालेल्या या दुर्घटनेत मरण पावणाऱ्यांची संख्या 49 होते आहे, अशी माहीती एक प्रांतीय आपत्कालीन अधिकारी मोहम्मद अली अखौंदी यांनी सरकारी वृत्तवाहिनीला दिली आहे.
शनिवारी हा स्फोट झाल्यापासून खाणीत अडकलेल्या अन्य कामगारांना सुखरुप बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले गेले होते. मात्र या प्रयत्नांना अपेक्षित यश न आल्यामुळे सर्व कामगार मरण पावले असावेत असा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
मिथेन वायूच्या गळतीमुळे या कोळशाच्या खाणीमध्ये हा स्फोट झाला होता. या दुर्घटनेत मरण पावणाऱ्या कामगारांच्या संख्येबाबत वेगवेगळी आकडेवारी सांगण्यात येत होती. इराणच्या कोळशाच्या खाणीत झालेली ही अलिकडच्या काळातली सर्वात भीषण दुर्घटना मानली जाते आहे.





