पिरंगुट : जीवन जगण्यासाठी मन व शरीर निरोगी राहणे गरजेचे आहे. स्पोर्ट डे हा शारीरिक तंदुरुस्ती, आरोग्य, टीम वर्क व खिलाडू वृत्तीला प्रोत्साहन देण्यासाठी साजरा केला जातो. त्यामुळे मुलांमध्ये धैर्य, चिकाटी, जिद्द, लीडरशिप, संयम, हार पचवण्याची ताकद असे अनेक गुण खेळाने विकसित होतात. त्यामुळे अभ्यासाबरोबरच प्रत्येकाने एक खेळ तरी चिकाटीने खेळलाच पाहिजे, असे आवाहन संस्थेचे संस्थापक राजेंद्र बांदल यांनी यावेळी केले.
बावधन (ता. मुळशी) येथील चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये स्पोर्ट्स मीट 2024-25 चे उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेतील जिल्हा, विभाग पातळीवर खेळाणार्या खेळाडूंनी क्रीडा ज्योत प्रांगणात फिरवून मान्यवरांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करून क्रीडा दिनाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी बावधन पोलीस स्टेशनचे निरीक्षक अनिल विभुते, कुमार भारत केसरी धनराज करंजावणे, माजी जिल्हा परिषद सदस्या स्वाती हुलावळे, राष्ट्रवादीचे नेते सुरेश हुलावळे, सूर्यकांत भाऊ भुंडे, संतोष दगडे, सदाशिव घुले, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बांदल, संचालिका रेखा बांदल, संचालिका शिवानी बांदल, मुख्याध्यापिका निर्मल पंडित इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन शाळेच्या मुख्याध्यापिका निर्मल पंडित यांच्या अध्यक्षतेखाली पर्यवेक्षिका कल्याणी शेळके, शिरीन काझी, क्रीडाशिक्षक सुरज साठे, व विशाल सर, सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले होते. सूत्रसंचालन सायली गायकवाड यांनी केले.