Syed Imtiaz Jaleel : MIM च्या इम्तियाज जलील यांची वक्फ बोर्डाच्या अधिकाऱ्याला धमकी

छत्रपती संभाजीनगर : संभाजीनगरमधून एक मोठी घटना समोर आली आहे. MIM चे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी वक्फ बोर्डाच्या कार्यालयात घुसून अधिकाऱ्याला धमकी दिली आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील आमखास मैदानावर वक्फ बोर्डाकडून बांधकाम होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर माजी खासदार इम्तियाज जलील यांनी थेट अधिकाऱ्यालाच गाडण्याची धमकी दिली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
काय म्हणाले जलील?
जमीन वक्फ बोर्डाची आहे आणि तिथं बांधकाम विभागाच्या वतीने बांधकाम कसं सुरू आहे त्याला एनओसी कोणी दिली? असे सवाल करत जलील अधिकाऱ्याला म्हणाले, तुला मैदानावर घेऊन जातो आणि जिथे खड्डे खोदले तिथेच तुला पुरून टाकेल अशी खुलेआम धमकी जलील यांनी अधिकाऱ्यांना दिली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
आमखास हे संभाजीनगरमधील सर्वात मोठे मैदान असून या ठिकाणी वक्फ बोर्डाच्या कार्यालयाची उभारणी करण्यात येणार होती. मात्र आता जलील यांनी त्यास विरोध केला असून बांधकामासाठी खोदण्यात आलेला खड्डा बुजवण्यास सांगितला आहे. तसेच हे काम होऊ देणार नाही अशा प्रकारची भूमिका इम्तियाज जलील यांनी मांडली आहे.





