मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी MIM ने आपले 5 उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये इम्तियाज जलील यांना छ. संभाजीनगरमधून, फारूक शहांना धुळ्यामधून, मुक्ती इस्माईल यांना मालेगावमधून, फारूक शाब्दी यांना सोलापूरमधून, तर रईस लष्करीया यांना मुंबईतून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर एमआयएमचे अससुद्दीन ओवेसी यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये ही घोषणा केली आहे. राज्यात विधानसभा निवडणूकांसाठी बहुतांश पक्षांकडून हळूहळू उमेदवारांची घोषणा होण्यास सुरुवात झाली आहे. राजकीय वर्तुळात विधानसभेचे वारे वाहत असून सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. MIM ने महाविकास आघाडीला सामील होण्यासाठी प्रस्ताव दिला होता. सप्टेंबर मध्यापर्यंत निर्णय न झाल्यास स्वबळावर निवडणूक लढवण्याचा इशारादेखील दिला होता.