Milind Soman | बॉलिवूड अभिनेता मिलिंद सोमण त्याच्या फिटनेसमुळे खास करून ओळखला जातो. पन्नाशीतही मिलिंद सोमण एकदम फिट दिसतो. मात्र सध्या तो त्याच्या अनोख्या फोटोशूटमुळे चर्चेत आला आहे. त्याला सोशल मीडियावर ट्रोलही केले जात आहे. मिलिंद सोमणने ‘बाझार इंडिया‘साठी केलेल्या फोटोशूटमध्ये मुलींचा लाँग वन पीस ड्रेस घातल्याचं दिसत आहे. मिलिंद सोमण या फोटोमध्येही एकदम फिट दिसत आहेत. पण हे फोटो पाहून मात्र काहींनी त्यांना ट्रोल केलं आहे. या फोटोशूटमुळे त्यांना सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे. या फोटोशूटमधील त्यांचा वेगळा अंदाज अनेकांना पसंत पडलेला नाही. Milind Soman | दरम्यान, त्याच्या फोटोवर एका अभिनेत्रीने ‘माझ्याकडे सुद्धा असाच सेम ड्रेस आहे,ट अशी कमेंट केली आहे. तर अनेकांनी कमेंट करत म्हटले की, ‘सॉरी हा ड्रेस तुम्हाला चांगला दिसत नाही.’ तर एकाने म्हटले, ‘हे अजिबात चांगला वाटत नाही.’ सध्या सोशल मीडियावर त्याचा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. Milind Soman | हेही वाचा: “आंबेडकरी जनतेशी विश्वासघात”; शिंदे आणि आनंदराज यांच्या युतीवर प्रकाश आंबेडकरांची तीव्र नाराजी