भाजपचे “ते’ व्हिडीओ तपासावेत – मिलिंद देवरा

Updated On:
भाजपचे “ते’ व्हिडीओ तपासावेत – मिलिंद देवरा

मिलिंद देवरा यांची निवडणूक आयोगाकडे मागणी
मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे सातत्याने मोदींविरोधात टीका करत असल्याने त्यांच्या विरोधात भाजप जे व्हिडीओ दाखवणार ते निवडणूक आयोगाने तपासावेत, अशी मागणी मुंबई कॉंग्रेस अध्यक्ष आणि दक्षिण मुंबई लोकसभेचे उमेदवार मिलिंद देवरा यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. राज ठाकरे यांनी आपल्या सभांमध्ये व्हिडीओ दाखवत भाजपच्या अनेक दाव्यांची पोलखोल केली आहे. त्यामुळे भाजप देखील व्हिडीओ दाखवून 27 एप्रिल रोजी उत्तर देणार आहे.

मुंबईतील प्रचाराची 27 एप्रिलला मुदत संपत आहे. त्यामुळे भाजप जे व्हिडीओ दाखवेल त्यावर कोणताही पक्ष किंवा नेता उत्तर देऊ शकणार नाही. भाजप जे आरोप करेल ते दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात छापून येईल, जे मतदारांना प्रभावित करेल. त्यामुळे भाजप जे व्हिडीओ दाखवणार ते आधी तपासून घेण्यात यावी, असे देवरा यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

प्रचाराची मुदत संपल्यावर याबाबत काही छापून येणार असेल किंवा दाखवण्यात येणार असेल तर ते नियमित असावे, अशी मागणीही केली आहे. आता लाव रे तो व्हिडीओ’ म्हणत मोदी-शहांवर हल्लाबोल करणाऱ्या राज ठाकरेंना प्रत्युत्तर देण्यासाठी भाजप देखील व्हिडीओचाच आधार घेणार आहे. 27 तारखेला होणाऱ्या भाजपच्या सभेत मनसेला मनसेच्याच स्टाईलने उत्तर मिळणार असल्याचे विनोद तावडे यांनी सांगितले आहे. त्यामुळे मनसे आणि राज ठाकरे यांची पोलखोल करणारा कोणता व्हिडीओ भाजपच्या हाती लागलाय याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

आणखी संबंधित बातम्या

Wagholi News: शिक्षक-पदवीधर निवडणुकांपूर्वी वाघोलीत राजकीय नियम धाब्यावर? आचारसंहिता भंग केल्याचा आरोप

2026-10-08 13:32:59

Wagholi News: शिक्षक-पदवीधर निवडणुकांपूर्वी वाघोलीत राजकीय नियम धाब्यावर? आचारसंहिता भंग केल्याचा आरोप

Rahul Gandhi: आंदोलन चिघळलं, राहुल गांधी-प्रियांका गांधी अडचणीत ; पोलिसांशी झटापटीच्या आरोपावरून आणखी एक FIR

2026-10-08 13:20:19

Rahul Gandhi: आंदोलन चिघळलं, राहुल गांधी-प्रियांका गांधी अडचणीत ; पोलिसांशी झटापटीच्या आरोपावरून आणखी एक FIR

Rahul Gandhi : 'मोर्चा रोखू शकता, पण आमची इच्छाशक्ती नाही'; सुटका झाल्यानंतर राहुल गांधींचा इशारा

2026-10-07 22:53:07

Rahul Gandhi : 'मोर्चा रोखू शकता, पण आमची इच्छाशक्ती नाही'; सुटका झाल्यानंतर राहुल गांधींचा इशारा

Mithun Chakraborty : मिथुन चक्रवर्तींना मोठी जबाबदारी; कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा, मिळाले ‘हे’ पद

2026-10-07 22:22:29

Mithun Chakraborty : मिथुन चक्रवर्तींना मोठी जबाबदारी; कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा, मिळाले ‘हे’ पद

State Name Change : थेट राज्याचं नावच बदलणार? भाजप प्रदेशाध्यक्षांचा मोठा दावा, नवं नावही सुचवलं

2026-10-07 19:26:25

State Name Change : थेट राज्याचं नावच बदलणार? भाजप प्रदेशाध्यक्षांचा मोठा दावा, नवं नावही सुचवलं