Milind Deora : राज्यसभेच्या अधीनस्थ विधेयक समितीच्या अध्यक्षपदी मिलिंद देवरा यांची नियुक्ती

नवी दिल्ली : शिवसेना शिंदे गटाचे नेते मिलिंद देवरा यांनी काही महिन्यांपूर्वीच राज्यसभेचे खासदार म्हणून शपथ घेतली होती. यानंतर आता राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी त्यांची राज्यसभेच्या अधीनस्थ विधेयक समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. याशिवाय भाजपा नेते लक्ष्मीकांत बाजपेयी यांना सभागृहात मांडल्या जाणाऱ्या कागदपत्रांशी संबंधित समितीचे अध्यक्ष करण्यात आले आहे.
तसेच इतरही नेत्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. जगदीप धनखड यांनी याचिका समितीचे अध्यक्षपदी आप नेते नारायण दास गुप्ता आणि सरकारी आश्वासनावरील समितीसाठी एम थंबीदुराई यांना नामनिर्देशित केले आहे. तसेच गोला बाबुराव, सुष्मिता देव, केसरी देव सिंग झाला, जोस के मणी, मनन कुमार मिश्रा, रंजित रंजन, सीव्ही षणमुगम, दिनेश शर्मा, कार्तिकेय शर्मा, नीरज शेखर, तिरुची शिवा, सदानंद महालू शेट तानावडे, जीके वासन आणि संगी यांच्या अधीनस्थ विधान पुनर्गठित समितीमध्ये सदस्य म्हणून नामनिर्देशित केले आहे.
राज्यसभेच्या अधिसूचनेनुसार, याचिका समितीमध्ये रमिलाबेन बेचरभाई बारा, राजेंद्र गेहलोत, जेबी माथेर, राम चंदर जांगरा, इरान्ना काडाडी, सुभाषीष खुंटिया, रंगावरा नरजारी, संतोष कुमार पी आणि नबाम रेबिया यांचा समावेश आहे.





