प्रभात वृत्तसेवा पुणे : मतदार यादीचे वाचन, मतदारांना स्लिप पाठवणे आणि घरोघरी प्रचाराच्या पुढच्या फेरीची तयारी या सगळ्या निवडणुकीच्या तयारीच्या वातावरणाने प्रभाग २५ मधील भाजपची निवडणूक कचेरी सध्या गजबजली आहे. अगदी हजारी भाग प्रमुखापासून ते तळागाळापर्यंत कामाच्या माध्यमातून पोहोचलेल्या भाजपने, प्रभाग २५ मध्ये मोठ्या मताधिक्याने विजय मिळवण्याचा निश्चय केला आहे. या प्रभागात भाजपाचे अधिकृत उमेदवार राघवेंद्र ऊर्फ बाप्पू मानकर, स्वरदा बापट, कुणाल टिळक, स्वप्नाली पंडित निवडणूक लढवत आहेत. प्रभाग २५ चे पदाधिकारी मनोज खत्री, किरण जगदाळे, नीलेश कदम, संतोष फडतरे, मनीष जाधव, प्रभाग अध्यक्ष सुनील रसाळ, प्रणव गंजीवाले, अनंत कुंटे, धनंजय डिंबळे, अजित सुकादने, योगिता गोगावले, रुपाली कदम, दिलीप पवार, सोहम भोसले, आदेश पारवे, अमित सोनवणे, अनिल पवार, बिपीन बोरावके, श्रेयस लेले यांच्यासह सर्व हजारी भाग प्रमुख आणि सर्व कार्यकर्ते या विजयासाठी परिश्रम घेत आहेत. आमदार हेमंत रासने यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रभागात आम्ही निवडणूक लढवत आहोत. ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या मेहनतीने, अनेक वर्षांपासून उभी राहिलेली संघटनेची फळी, निवडणुकीचे मायक्रो मॅनेजमेंट आणि विकासकामे नागरिकांपर्यंत पोहोचविणाऱ्या कार्यकर्त्यांच्या जोरावर प्रभाग २५ मध्ये मोठा विजय मिळविण्याचा निर्धार आहे. – अमित कंक, अध्यक्ष, कसबा विधानसभा, भाजप