MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा ऐतिहासिक विजय, IPL च्या १८ वर्षांत ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच संघ

MI vs LSG Mumbai Indians Create IPL History with 150th Win : आयपीएल २०२५ चा ४५ वा लीग सामना मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात, एमआयने एलएसजीचा ५४ धावांनी पराभव केला. या सामन्या प्रथम फलंजदाजी करताना सात गडी गमावून २१५ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात लखनौ संघ २० षटकांत १६१ धावांवर सर्वबाद झाला. या विजयसह मुंबई इंडियन्स संघाने आयपीएलमध्ये इतिहास रचला आहे.
मुंबई इंडियन्स आयपीएलमध्ये केला खास पराक्रम –
मुंबई इंडियन्स आयपीएल इतिहासात सर्वाधिक १५० विजय मिळवणारा विजय ठरला आहे. मुंबईचा लखनौविरुद्धचा विजय हा १५० वा होता. असा पराक्रम करणारा मुंबई हा पहिला संघ ठरला आहे. पाच वेळच्या चॅम्पियन मुंबई संघाने हा पराक्रम २७१ सामन्यात केला आहे. चेन्नई सुपर किंग्ज (CSK) या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. आयपीएलमध्ये सीएसकेने २४८ पैकी १४० सामने जिंकले आहेत. सीएसकेने पाच वेळा आयपीएलचे विजेतेपदही जिंकले आहे.
5️⃣ 𝗪𝗜𝗡𝗦 𝗜𝗡 𝗔 𝗥𝗢𝗪 📈💙@ril_foundation | #ESADay #EducationAndSportsForAll #MumbaiIndians #PlayLikeMumbai #TATAIPL #MIvLSG pic.twitter.com/AYRU1GuUTU
— Mumbai Indians (@mipaltan) April 27, 2025
या यादीत तिसऱ्या क्रमांकावर कोलकाता नाईट रायडर्स संघ आहे. कोलकाता नाईट रायडर्स (KKR) ने आतापर्यंत १३४ सामने जिंकले आहेत. गतविजेत्या केकेआरने २६१ सामने खेळले आहेत. केकेआरने एकूण तीन वेळा आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) चौथ्या स्थानावर आहे. आरसीबीने २६६ पैकी १२९ सामने जिंकले आहेत. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्स (DC) पाचव्या स्थानावर आहे. डीसीने आयपीएलमध्ये २६१ पैकी १२१ सामने जिंकले आहेत.
हेही वाचा – MI vs LSG : मुंबईने घेतला पराभवाचा बदला! जसप्रीत बुमराहसमोर लखनौच्या फलंदाजांची उडाली भंबेरी
मुंबईचा आयपीएल २०२५ मधील सलग पाचवा विजय –
सामन्याबद्दल बोलायचे, तर आयपीएल २०२५ मध्ये खराब सुरुवातीनंतर जोरदार पुनरागमन करत हार्दिक पंड्याच्या संघाने सलग पाचवा विजय मिळवला आहे. वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात, मुंबईने लखनौचा ५४ धावांनी पराभव केला. यासह मागील पराभवाचा बदलाही घेतला. सूर्यकुमार यादव आणि रायन रिकेल्टन यांच्या शानदार अर्धशतकांनंतर, स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि विल जॅक्स यांच्या धारदार गोलंदाजीमुळे सहाव्या विजयावर शिक्कामोर्तब केला.





