MI vs LSG : मुंबईने घेतला पराभवाचा बदला! जसप्रीत बुमराहसमोर लखनौच्या फलंदाजांची उडाली भंबेरी

MI vs LSG Mumbai Indians beat Lucknow Super Giants in IPL 2025 : आयपीएल २०२५ मध्ये खराब सुरुवातीनंतर जोरदार पुनरागमन करत हार्दिक पंड्याच्या संघाने सलग पाचवा विजय मिळवला आहे. वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात, मुंबईने लखनौचा ५४ धावांनी पराभव केला. यासह मागील पराभवाचा बदलाही घेतला. सूर्यकुमार यादव आणि रायन रिकेल्टन यांच्या शानदार अर्धशतकांनंतर, स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि विल जॅक्स यांच्या धारदार गोलंदाजीमुळे सहाव्या विजयावर शिक्कामोर्तब केला.
बुमराहने मलिंगाला टाकले मागे –
लखनौने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु सूर्यकुमार यादव आणि रायन रिकलटन यांच्या अर्धशतकांच्या मदतीने मुंबईने २० षटकांत सात गडी गमावून २१५ धावा केल्या. प्रत्युत्तरात लखनौ संघ २० षटकांत १६१ धावांवर सर्वबाद झाला. मुंबईकडून बुमराहने शानदार गोलंदाजी केली आणि चार षटकांत २२ धावा देत चार विकेट्स घेतल्या. यासह, बुमराह मुंबईचा सर्वात यशस्वी गोलंदाज बनला आहे आणि त्याने या बाबतीत लसिथ मलिंगाला मागे टाकले आहे.
𝐉𝐢𝐧𝐤𝐥𝐨𝐨𝐨𝐨 𝐫𝐞𝐞𝐞 🕺🥳@ril_foundation | #ESADay #EducationAndSportsForAll #MumbaiIndians #PlayLikeMumbai #TATAIPL #MIvLSG pic.twitter.com/kZgJshWfef
— Mumbai Indians (@mipaltan) April 27, 2025
लखनौच्या फलंदाजांनी टांगली नांगी –
मटकीला मोड नाही, बुमराह ला जगात तोड नाही 🎯💥@ril_foundation | #ESADay #EducationAndSportsForAll #MumbaiIndians #PlayLikeMumbai #TATAIPL #MIvLSG pic.twitter.com/WMNioyZK2J
— Mumbai Indians (@mipaltan) April 27, 2025
लक्ष्याचा पाठलाग करताना, लखनौची सुरुवात चांगली झाली नाही. कारण त्यांनी एडेन मार्क्रमची विकेट लवकर गमावली, जो नऊ धावा करून बाद झाला. त्यानंतर विल जॅक्सने १५ चेंडूत २७ धावा करून बाद झालेल्या निकोलस पूरनला बाद करून लखनौला मोठा धक्का दिला. लखनौचा कर्णधार पुन्हा एकदा अपयशी ठरला आणि चार धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. मिचेल मार्शने काही प्रमाणात संघाला सांभाळण्याचा प्रयत्न केला असला तरी, बोल्टने त्याचा डाव संपुष्टात आणला. तो २४ चेंडूत ३४ धावा करून बाद झाला.
हेही वाचा – MI vs LSG : जसप्रीत बुमराहने मुंबईसाठी रचला सर्वात मोठा इतिहास, मोडला लसिथ मलिंगाचा खास विक्रम
बोल्ट-बुमराहने घेतल्या सात विकेट्स –
लखनौने डेव्हिड मिलरला एक प्रभावी खेळाडू म्हणून संघात आणले आणि त्याने आयुष बदोनीसोबत भागीदारी करण्याचा प्रयत्न केला. बोल्टने बडोनीला ३५ धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले आणि त्यानंतर मिलरही बुमराहचा बळी ठरला. मिलर २४ धावा करून बाद झाला. त्याच षटकात बुमराहने अब्दुल समद आणि आवेश खान यांच्या विकेट्स घेतल्या. रवी बिश्नोईने दोन षटकार मारून धावसंख्या कमी करण्याचा प्रयत्न केला पण कॉर्बिन बॉशने त्याला माघारी पाठवले. डावाच्या शेवटच्या चेंडूवर बोल्डने दिग्वेश राठीला बाद केले आणि लखनौचा डाव संपुष्टात आणला. बुमराह व्यतिरिक्त, मुंबईकडून बोल्टने तीन, तर विल जॅक्सने दोन आणि बॉशने एक विकेट्स घेतल्या.





