MI vs LSG : जसप्रीत बुमराहने मुंबईसाठी रचला सर्वात मोठा इतिहास, मोडला लसिथ मलिंगाचा खास विक्रम

MI vs LSG Jasprit Bumrah Becomes MI All Time Leading Wicket Taker in IPL History : आयपीएल २०२५ च्या ४५ व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स आमनेसामने आहेत. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करत लखनौ संघाला विजयासाठी २१६ धावांचे लक्ष्य दिले. लखनौच्या डावात प्रभावी खेळाडू म्हणून आलेल्या जसप्रीत बुमराहने त्याच्या पहिल्याच षटकात सलामीवीर एडेन मार्करमला बाद करत इतिहास रचला.
जसप्रीत बुमराहने रचला इतिहास –
जसप्रीत बुमराहने एडेन मार्करमला बाद मोठी कामगिरी केली आहे. तो आता आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज बनला आहे. त्याने या बाबतीत माजी दिग्गज गोलंदाजी लसिथ मलिंगाला मागे टाकले आहे. बुमराहने सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात १ विकेट घेतली आणि मुंबई इंडियन्सकडून सर्वाधिक १७० विकेट्स घेणाऱ्या लसिथ मलिंगाची बरोबरी केली होती. मात्र आता बुमराहच्या नावावर १७१* विकेट्स आहेत.
Jasprit Bumrah overtakes Lasith Malinga to become the highest wicket-taker for MI 🔥#jaspritbumrah #IPL2025 #IPL pic.twitter.com/flX2zGM4JJ
— Cricbuzz (@cricbuzz) April 27, 2025
बुमराहने मलिंगाला टाकले मागे –
जसप्रीत बुमराहने त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील १४० व्या सामन्यात मलिंगाचा विक्रम मोडला. बुमराहने २०१३ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या सामन्यातून आपल्या आयपीएल कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्याने मुंबई इंडियन्सकडून खेळायला सुरुवात केली आणि तेव्हापासून तो या संघाचा भाग आहे. या काळात बुमराहने मुंबईसाठी अनेक सामने स्वतःच्या बळावर जिंकून दिले आहेत. तसेच आज तो या संघातील सर्वात महत्वाच्या खेळाडूंपैकी एक बनला आहे.
हेही वाचा – MI vs LSG : सूर्यकुमार यादवने रचला इतिहास! IPL मध्ये ‘हा’ मोठा पराक्रम करणारा ठरला पहिलाच भारतीय
आयपीएलच्या इतिहासात मुंबई इंडियन्ससाठी सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज :
- जसप्रीत बुमराह १७१*
- लसिथ मलिंगा १७०
- हरभजन सिंग १२७
- मिचेल मॅकक्लेनघन ७१
- किरॉन पोलार्ड ६९
- हार्दिक पंड्या ६५





