IPL 2024 (MI vs KKR Match 51) : मुंबईने कोलकाताविरुद्ध Toss जिंकला, कर्णधार हार्दिकनं घेतला ‘हा’ निर्णय…

IPL 2024 (Mumbai Indians vs Kolkata Knight Riders, Match 51) :- आयपीएल 2024 चा 51 वा सामना मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. हा सामना थोड्याच वेळात म्हणजे संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून खेळवला जाईल.
तत्पूर्वी , झालेला नाणेफेकीचा कौल हा मुंबई इंडियन्सच्या बाजूनं लागला आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. केकेआर प्रथम फलंदाजी करेल.
🚨 Toss Update 🚨@mipaltan win the toss & elect to bowl first against @KKRiders
Follow the Match ▶️ https://t.co/iWTqcAsT0O#TATAIPL | #MIvKKR pic.twitter.com/yYjLioIQML
— IndianPremierLeague (@IPL) May 3, 2024
पाच वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्सची अवस्था वाईट आहे. सलग तीन सामने हरले असून त्याच्या प्लेऑफच्या आशा जवळपास संपल्या आहेत. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सने आतापर्यंत खेळल्या गेलेल्या 10 पैकी फक्त तीन सामने जिंकले आहेत आणि 7 गमावले आहेत. गुणतालिकेत संघ 9व्या स्थानावर आहे. त्याखाली फक्त रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आहे. मुंबईला लखनौ सुपर जायंट्स, दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या मागील तीन सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. आता मुंबईचे चार सामने बाकी आहेत. जर संघाला प्लेऑफमध्ये जाण्याची थोडीशी आशाही कायम ठेवायची असेल तर त्यांना सर्व सामने जिंकावे लागतील.
आयपीएल 2024 मध्ये कोलकाता नाइट रायडर्सची आतापर्यंतची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील KKR ने आतापर्यंत 9 पैकी 6 सामने जिंकले असून त्यांचे 12 गुण आहेत. KKR सध्या IPL 2024 च्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. त्याचवेळी केकेआरने त्यांच्या शेवटच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला होता. अशा स्थितीत केकेआरचे मनोबल उंचावलेले आहे. या संघाची नजर प्लेऑफवर असेल. अशा स्थितीत केकेआरलाही हा सामना कोणत्याही किंमतीत जिंकायचा आहे.





