MI vs DC : मुंबईने दिल्लीचा धुव्वा उडवत प्लेऑफमध्ये दणक्यात मारली एन्ट्री! सूर्या-सँटनर ठरले गेमचेंजर

MI vs DC Mumbai Indians beat Delhi Capitals to reach playoffs : मुंबई इंडियन्सने सूर्या-सँटनरच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सचा ५९ धावांनी धुव्वा उडवत प्लेऑफमध्ये दणक्यात एन्ट्री मारली आहे. यासह मुंबई आयपीएल २०२५ च्या प्लेऑफमध्ये पोहोचणारा चौथा संघ ठरला आहे. यापूर्वी गुजरात टायटन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांनी प्लेऑफमध्ये स्थान पटकावले होते. या सामन्यात मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना १८१ धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात दिल्ली कॅपिटल्सचा संघ १२१ धावांतच गारद झाला.
सूर्या-नमनने शेवटच्या दोन षटकांत फिरवला गेम –
या सामन्यात मुंबई इंडियन्स प्रथम फलंदाजी करत असताना, १८ षटकांनंतर संघाची धावसंख्या फक्त १३२ धावा होती. त्यावेळी असे वाटत होते की मुंबईचा संघ जास्तीत जास्त १६० धावा करू शकेल, परंतु मुंबईसाठी सूर्या आणि नमनने शेवटच्या दोन षटकांमध्ये खूप मोठा धमाका केला. या दोघांनी उर्वरित दोन षटकांत ४८ धावा केल्या. ज्यामुळे १६० च्या आसपास पोहोचेल असा वाटणारा मुंबई संघ १८० धावांवर पोहोचला.
SKY shines the brightest when the heat is on ☀
A clutch & composed knock of 73*(43) earns Surya Kumar Yadav the Player of the Match award 🫡
Scorecard ▶ https://t.co/fHZXoEKt3L#TATAIPL | #MIvDC | @mipaltan | @surya_14kumar pic.twitter.com/0VO1L04QQe
— IndianPremierLeague (@IPL) May 21, 2025
आजच्या या निर्णयाक सामन्यात सूर्यकुमार यादवने ४३ चेंडूंचा सामना करताना ७ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने नाबाद ७३ धावांची खेळी साकारली. या दरम्यान नमन धीरने उत्तम साथ दिली. त्याने ८ चेंडूंत दोन षटकार आणि तितक्याच चौकारांच्या जोरावर नाबाद २४ धावांची वेगवान खेळी केली. दिल्लीकडून मुकेश कुमारने दोन तर दुष्मंथ चामीरा, मुस्तफिजूर रहमान आणि कुलदीप यादवने प्रत्येकी एक विकेट घेतली.
हेही वाचा – Kuldeep Yadav : कुलदीप यादवने आयपीएलमध्ये पार केला मोठा पल्ला! ‘ही’ कामगिरी करणार ठरला चौथा भारतीय
दिल्ली कॅपिटल्सचे फलंदाज ठरले अपयश –
The quest for Title No. 6⃣ is alive 🏆
Congratulations to @mipaltan who become the fourth and final team into the #TATAIPL 2025 playoffs 💙 👏#MIvDC pic.twitter.com/gAbUhbJ8Ep
— IndianPremierLeague (@IPL) May 21, 2025
१८१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्स संघ सुरुवातीपासूनच दबावाखाली दिसत होता. संघाच्या विकेट्स पडण्याचा क्रम दुसऱ्याच षटकात सुरू झाला. या सामन्यात दिल्लीचे नेतृत्व करणारा फाफ डू प्लेसिस ६ चेंडूत ७ धावा करून बाद झाला. नंतर, केएल राहुल (११), अभिषेक पोरेल (६) आणि ट्रिस्टन स्टब्स (२) कोणताही प्रभाव न पाडता बाद झाले. विप्राज निगमने निश्चितच काही चांगले शॉट्स खेळले पण तोही ११ चेंडूत २० धावा काढून बाद झाला.
हेही वाचा – MI vs DC : सूर्यकुमार यादवने रचला नवा इतिहास! ‘हा’ पराक्रम करणारा ठरला जगातील पहिलाच फलंदाज
समीर रिझवी काही वेळ क्रीजवर राहिला पण त्याच्या बॅटमधूनही मोठी खेळी आली नाही. तो ३५ चेंडूत ३९ धावा करून बाद झाला. दिल्लीकडून रिझवी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. त्याच्या विकेट्सनंतर मुंबईचा विजय फक्त औपचारिकता राहिली. मुंबईकडून सर्वात यशस्वी गोलंदाज मिचेल सँटनर आणि जसप्रीत बुमराह होते, दोघांनीही प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या.





