MHADA Lottery 2025 : कोकण गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळामार्फत MHADA Lottery 2025 अंतर्गत 5,362 सदनिका आणि 77 भूखंडांच्या विक्रीसाठी लॉटरी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये नवी मुंबईतील दिघा, सानपाडा, नेरुळ, घणसोली आणि गोठेघर येथील 293 घरांचा समावेश आहे. ही घरं अत्यल्प व अल्प उत्पन्न गटांसाठी असून 14 लाखांपासून त्यांच्या किंमती सुरू होतात. दिघा येथील BK’s Galaxy Realtors LLP प्रकल्पातील 112 घरं अत्यल्प उत्पन्न गटासाठी असून किंमत 18.59 लाख रुपये आहे. याचे क्षेत्रफळ 29.10 चौ.मी. असून अर्ज व अनामत रक्कम 5,590 रुपये आहे. नेरुळमधील Pyramid Developers प्रकल्पात अल्प उत्पन्न गटासाठी 18 घरं असून किंमती 23 ते 30 लाख रुपये आहेत. क्षेत्रफळ 42.44 ते 54.59 चौ.मी. असून अर्जासाठी 10,590 रुपये भरावे लागतील. सानपाडा येथील DPVG Ventures LLP प्रकल्पात 19 घरं असून त्यापैकी 2 अत्यल्प उत्पन्न गटातील (14 लाख), तर 17 घरं अल्प उत्पन्न गटातील (18 ते 24 लाख) आहेत. क्षेत्रफळ 29.06 ते 49.91 चौ.मी. असून अर्ज शुल्क अनुक्रमे 5,590 व 10,590 रुपये आहे. घणसोली येथील Nilkanth Infratech प्रकल्पात 18 घरं असून किंमत 16 ते 25 लाखांदरम्यान आहे. क्षेत्रफळ 32.52 ते 48.19 चौ.मी. आहे. याशिवाय, घणसोलीतील दुसऱ्या टप्प्यात 21 घरं असून त्यांची किंमत 23 ते 28 लाखांदरम्यान आहे. कामधेनु ग्रॅण्ड्युअर, सानपाडा येथे 17 घरं (23–28 लाख, 42.32–49.92 चौ.मी.) आणि गोठेघरमध्ये सर्वाधिक 88 घरं असून किंमत 36–37 लाख, क्षेत्रफळ 47.85 चौ.मी. इतके आहे. दरम्यान, नवी मुंबईत घर घेण्याचा विचार करणाऱ्यांसाठी ही MHADA लॉटरी मोठी संधी ठरणार आहे.