Mexico : मेक्सिकोच्या नौदलचे जहाज ब्रुकलिन पुलाला धडकले

न्यूयॉर्क : मेक्सिकोच्या नौदलाचे प्रशिक्षणासाठीचे एक जहाज आज न्यूयॉर्क शहरातील ब्रुकलिन पुलाला धडकले. जहाजाचे वरील तीन मजले पुलाच्या कठड्याला धडकल्यामुळे जहाज आणि पुलाच्या बांधकामाचेही नुकसान झाले. पुलाचा काही भाग इस्ट नदीमध्ये कोसळला. या अपघातामुळे जहाजावरील खलाशी नदीच्या पाण्यात पडले आणि काही जण जखमी झाले.
न्यूयॉर्कच्या फायर डिपार्टमेंटने जखमी खलाशांना पाण्यातून बाहेर काढले मात्र एकूण किती जण या अपघातात जखमी झाले होते, याचा कोणताही तपशील दिला नाही. पाण्यात पडलेले किती जण जहाजावरचे होते आणि किती जण पुलावरचे होते, याची आकडेवारी देखील मिळू शकली नाही. हा अपघात अनेक जणांच्या डोळ्यांसमोर घडला. या घटनेचा व्हिडीओ देखील इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. ही घटना घडली तेंव्हा पुलावर मोठी वर्दळ सुरू होती, असेही या व्हिडीओमध्ये दिसते आहे.
Brooklyn *WATER RESCUE* Box 0492
Manhattan Bridge
BOAT ACCIDENT, PEOPLE IN THE WATER. TUG BOAT REMOVING PPL FROM THE WATER pic.twitter.com/DPqS5IzsP2— NYCFireWire (@NYCFireWire) May 18, 2025
मेक्सिकोच्या नौदलाची ही बोट मेक्सिकोच्या ध्वजाप्रमाणे पांढऱ्या आणि लाल रंगातली होती. पुलाला धडकल्यानंतर ही बोट नदीच्या किनाऱ्याजवळ आली. बोट किनाऱ्याजवळ येत असल्याचे बघूनकिनाऱ्यावरील लोकांची धावपळ उडाली. मेक्सिको नौदलाच्या या प्रशिक्षण अकॅडमीच्या कॉहतेमोक या बोटीचे दुर्घटनेमुळे मोठे नुकसान झाले, असे मेक्सिकोच्या नौदलाने एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. या बोटीचा पुढील प्रवास स्थगित केला गेला असून बोटीवरील वस्तूंच्या सुस्थितीचा आढावा घेतला जातो आहे. ही बोट एकूण २५४ दिवसांच्या प्रवासात ब्रिटन, जमैका, हवाना, क्युबा, कोझमुमेल, मेक्सिको आणि न्यूयॉर्कसह १५ देशांमधील २२ बंदरांना भेट देणार होती,
नौदलाच्या बोटीचा दरवर्षीचा प्रवास
ब्रुकलिन पूल १८८३ वाहतुकीसाठी खुला केला गेला होता. या पुलाची लांबी तब्बल ४९० मीटर असून दोन टॉवरवर हा पूल उभा आहे. दररोज सुमारे १ लाख वाहने आणि ३२ हजार पादचारी पुलावरून प्रवास करतात हा पूलपर्यटकांसाठी मोठे आकर्षण केंद्र आहे. तर कॉहतेमोक ही बोट २९७ फूट लांब आणि ४० फूट रुंद आहे. अकॅडमीचे प्रशिक्षण संपल्यानंतर दरवर्षी ही बोट मेक्सिकोच्या अकापुलको पॅसिफिक समुद्रातल्या बंदरात जाते. त्यानुसार ६ एप्रिलला ही बोट तेथे जाण्यासाठी निघाली होती. बोटीवर २७७ खलाशी होते.असे मेक्सिकोच्या नौदलाने म्हटले आहे.





