Pune Ring Road : पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मंजुरी; वाहतूक कोंडी सुटणार?
Pune Ring Road : मुंबई महानगर प्रदेश (MMR) आणि पुणे शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी राज्य सरकारने दोन अत्यंत महत्त्वाच्या आणि मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता दिली आहे.

Pune Ring Road : राज्य सरकारने १७,७२४.९९ कोटी रुपये अंदाजित खर्चाच्या मेट्रो मार्ग १३ प्रकल्पास मंजुरी दिली आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तसेच, पुणे रिंग रोडच्या विस्तारासाठी १०,५०२.३६ कोटी रुपयांच्या सुधारित प्रकल्प खर्चालाही पायाभूत सुविधा समितीने प्रशासकीय मान्यता दिली आहे. मंत्रालयात फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हे निर्णय घेण्यात आले. (Pune Ring Road)
२५.०३ किमी लांबीचा मेट्रो मार्ग १३ हा ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतून जाईल. हा मार्ग मुंबई उपनगरांमधील मीरा-भाईंदरला वसई-विरारशी जोडेल. याची अंमलबजावणी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण द्वारे केली जाणार आहे. (Pune Ring Road)
एकूण मार्गापैकी २१.७८ किमी मार्ग उन्नत असेल आणि ३.२५ किमी मार्ग भूमिगत असेल. या मार्गावर १६ स्थानके असतील, त्यापैकी १३ उन्नत आणि तीन भूमिगत असतील. पुढील सहा महिन्यांत भूसंपादन आणि रस्ते पूर्ण करण्याचे निर्देश फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना दिले. (Pune Ring Road)
तसेच, पूणे रिंग रोडच्या विस्तारासाठी १०,५०२.३६ कोटी रुपयांच्या सुधारित प्रकल्प खर्चालाही पायाभूत सुविधा समितीने प्रशासकीय मान्यता दिली. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ या प्रकल्पाची अंमलबजावणी करणार आहे. (Pune Ring Road)
या विस्तारामध्ये पुणे-सोलापूर मार्गावरील सोरतापवाडी (वाल्टी) ते पुणे-सातारा मार्गावरील वरवे (बुद्रुक)-शिवरे या दरम्यानच्या ३१.८०५ किमी लांबीच्या प्रवेश-नियंत्रित द्रुतगती मार्गाचा समावेश आहे. (Pune Ring Road)
आंतरराज्यीय आणि आंतर-शहरी वाहतूक पुण्याच्या बाहेरून वळवून शहरातील वाहतूक कोंडी कमी करणे हा या रिंग रोडचा उद्देश आहे. हा संपूर्ण प्रकल्प १६८.९८१ किमी लांबीचा असून, संपूर्ण मार्गाची सलगता सुनिश्चित झाल्यावर तो एक एकात्मिक ॲक्सेस-कंट्रोल्ड कॉरिडॉर बनेल. (Pune Ring Road)
सुमारे ८० टक्के भूसंपादन पूर्ण झाले असून जून २०२९ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या रस्त्यावर प्रत्येक दिशेला तीन मार्गिका (लेन) असतील आणि ताशी १२० किमी वेगमर्यादा असेल. (Pune Ring Road)
यात एक इंटरचेंज, तीन मोठे व पाच छोटे पूल, १८ व्हायडक्ट्स (उंच पूल/फ्लायओव्हर्स) आणि चार बोगद्यांचा समावेश असेल. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वृक्षारोपण आणि इंटरचेंजजवळ लँडस्केपिंग करण्याचा प्रस्तावही यात समाविष्ट आहे. (Pune Ring Road)





