सात धातू कंपन्यांचे टाटा स्टीलमध्ये विलीनीकरण

नवी दिल्ली – टाटा समूहाने टाटा स्टीलमध्ये इतर सात धातू कंपन्यांचे विलीनीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. या कंपन्यात कार्यक्षमता वाढावी आणि उत्पादन खर्च कमी करावा यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे टाटा स्टीलने म्हटले आहे.
सर्व कंपन्यांचे भांडवल एकत्रित आल्यास त्याचा कंपन्यांच्या विस्तारीकरणासाठी आणि उत्पादन वाढविण्यासाठी वापर करण्यास मदत होईल असे कंपनीने म्हटले आहे. त्याचबरोबर या कंपन्यांना परस्परांच्या वितरण व्यवस्थेचाही फायदा होऊ शकेल. अगोदर टाटा कंजूमर आणि टाटा कॉफी या दोन कंपन्यांचे विलीनीकरन करण्यात आले आहे.
त्याचबरोबर एअर इंडिया, विस्तारा आणि एअर एशिया या तीन विमान कंपन्याचे विलीनीकरण करण्यात येणार आहे. आगामी काळामध्ये धातू क्षेत्रामध्ये महत्त्वाच्या घडामोडी उघडणार आहेत. अशा परिस्थितीमध्ये धातू क्षेत्रात टाटा समूहाचे काम विस्तारित व्हावे यासाठी हा निर्णय घेतला आहे.





