Sanjay Raut : मोदी-शाहांचं नाव घेतलं, संजय राऊत मोर्चाच्या दिवशी थेट म्हणाले “केवळ ज्ञानेश कुमार यांनाच नाही तर…”
Sanjay Raut : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात मुंबईत गर्जना मोर्चा सुरू होत आहे. सुरुवातीला भायखळापासून सुरू होणाऱ्या या मोर्चाच्या मार्गात बदल करण्यात आला असून, आता मेट्रो सिनेमा ते मुंबई महापालिका मुख्यालयापर्यंत हा मोर्चा निघणार आहे.

Sanjay Raut : केंद्रीय निवडणूक आयागाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात ठाकरे बंधूंनी आक्रमक पवित्रा घेतला असून, आज मुंबईत त्यांच्या राजीनाम्यासाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाच्या माध्यमातून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच खासदार संजय राऊत यांनी एक मोठा दावा केला आहे.
केवळ ज्ञानेश कुमार यांनाच नाही तर मोदी आणि शाह यांनाही घरी जावे लागणार असल्याचा मोठा दावा संजय राऊतांनी केला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली असून त्यांनी केलेल्या दाव्यावरुन राजकारण आणखी तापणार आहे.
संजय राऊतांनी केली मोठी मागणी
“सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि त्यापूर्वीचे आयुक्त राजीव कुमार हे दोन्ही या देशाचे दुश्मन आहे. त्यांच्यामुळेच भाजप या निवडणुका जिंकल्या. त्यांच्या कार्यकाळातील सर्व निवडणुका रद्द कराव्यात. त्यांच्या कार्यकाळातील लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका रद्द करून नव्याने निवडणुका झाल्या पाहिजेत.” अशी मोठी मागणी संजय राऊतांनी केली आहे.
यावेळी बोलताना संजय राऊतांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला. “मुंबई जवळच्या एका जिल्ह्यातील, शहरातील जनता एकत्र येऊन ते शहर भयमुक्त करावे यासाठी सर्वपक्षीय नेते, नागरीक येत असतील तर ही सरकारसाठी लाजीरवाणी गोष्ट आहे, खासकरून फडणवीस यांच्यासाठी.”
दरम्यान, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात मुंबईत गर्जना मोर्चा सुरू होत आहे. सुरुवातीला भायखळापासून सुरू होणाऱ्या या मोर्चाच्या मार्गात बदल करण्यात आला असून, आता मेट्रो सिनेमा ते मुंबई महापालिका मुख्यालयापर्यंत हा मोर्चा निघणार आहे. या मोर्चात मोठ्या संख्येने सर्वपक्षीय नेते आणि नागरिक सहभागी झाल्याचे दिसत आहे. या मोर्चाला काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जाहीर पाठिंबा दर्शवला आहे.
Gayatri Datar : ‘लग्न रद्द होणार होतं, एवढचं नाही तर..’; अभिनेत्री गायत्री दातार हिचा मोठा खुलासा






