धक्कादायक…! मतिमंद तरुणीवर दोघांकडून जबरदस्ती अत्याचार; तरुणी १५ आठवड्याची गर्भवती…

सांगली : सांगलीतून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लग्नाचे आमिष दाखवून मतिमंद तरुणीच्या असाहाय्यतेचा फायदा घेत दोघांनी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याने ती १५ आठवड्याची गर्भवती राहिली आहे. याबाबत तिच्या आईने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संशयित दिशान शेख (वय २५, रा. कुंठेगाव, सोलापूर) याच्यासह एका अल्पवयीन मुलावर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, २२ वर्षीय तरुणी ही मतिमंद आहे. संशयित शेख व अल्पवयीन मुलगा हे मागील वर्षापासून तिच्या असाहाय्यतेचा फायदा घेत होते. तिला लग्नाचे आमिष दाखवून कवलापूर परिसरात तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. या प्रकरणातून तरूणी गर्भवती राहिली. १५ आठवड्याची गर्भवती राहिल्यानंतर तिच्या आईच्या हा प्रकार लक्षात आला.
तिने विचारपूस केल्यानंतर मुलीने घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानुसार तिच्या आईने सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली. संशयित दिशान व अल्पवयीन मुलगा अशा दोघांविरूद्ध बलात्कार आणि अपंग व्यक्ती अधिकार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
बदनामीच्या भीतीने १७ वर्षांच्या मुलीची आत्महत्या
साकिनाका परिसरात बदनामीच्या भीतीने एका सतरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी विनयभंगासह आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि पोक्सोच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच १९ वर्षांच्या आरोपी मित्राला साकिनाका पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यात तो सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.





