Menopause: मेनोपॉजच्या काळातही राहा फिट आणि आनंदी; आयुर्वेद सांगतो हे खास उपाय
Updated On:

Menopause: स्त्रियांच्या आयुष्यात अनेक टप्प्यांवर वेगवेगळे शारीरिक आणि मानसिक बदल होत असतात. त्यापैकी एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे ‘मेनोपॉज’. म्हणजेच मासिक पाळी कायमस्वरूपी थांबणे. साधारणपणे ४० वर्षांनंतर हा काळ सुरू होतो. या बदलामुळे शरीरात हार्मोन्समध्ये असंतुलन निर्माण होतं आणि त्यामुळे स्त्रियांना अनेक त्रास जाणवतात.
मेनोपॉजच्या काळात शरीरात होणारे बदल
- या काळात महिलांना अनेक शारीरिक आणि मानसिक लक्षणं जाणवतात.
- शरीरात उष्णतेच्या लाटा (हॉट फ्लॅशेस) येणे.
- मूड स्विंग्स, चिडचिड आणि चिंता वाढणे.
- झोप न लागणे किंवा रात्री वारंवार जाग येणे.
- थकवा, ऊर्जेचा अभाव, आणि स्मरणशक्ती कमी होणे.
- हे बदल केवळ शरीरापुरते मर्यादित नसतात तर ते मन आणि भावनांवरही परिणाम करतात. त्यामुळे या काळात स्वतःची योग्य काळजी घेणे अत्यंत आवश्यक असते.
आयुर्वेद सांगतो समतोल राखा
- आयुर्वेदानुसार, शरीर आणि मन यांच संतुलन राखणे हे आरोग्याचं मूळ आहे.
- या काळात पुढील काही उपाय उपयोगी ठरतात
- शतावरीसारख्या आयुर्वेदिक औषधींचा वापर करा.
- शतावरी हार्मोनल समतोल राखते, शरीरातील कमजोरी कमी करते आणि मानसिक शांतता देते.
- संतुलित आहार आणि दिनचर्या ठेवा
- हलका, पौष्टिक आहार, वेळेवर झोप, आणि सकारात्मक विचार यांचा अवलंब करा.
योग व प्राणायाम करा
- योग शरीरात ऊर्जा टिकवतो, हाडं आणि सांधे मजबूत ठेवतो, तसेच झोप आणि मनःशांती सुधारतो.
- हा टप्पा नैसर्गिक आहे, तो आनंदाने स्वीकारा
- आयुर्वेद सांगतो की, या नैसर्गिक जीवनाच्या टप्प्याला योग्य काळजी आणि आत्मविश्वासाने स्वीकारल्यास महिला केवळ निरोगीच नाही, तर अधिक सक्षम आणि आनंदी राहू शकतात.
शेवटी काय लक्षात ठेवाल
मेनोपॉज हा आजार नसून जीवनाचा एक नवा, सकारात्मक टप्पा आहे. योग्य माहिती, आयुर्वेदिक उपचार, ध्यान, योग आणि संतुलित जीवनशैलीद्वारे महिलांनी हा काळ शांततेने पार करावा.
हा काळ केवळ शरीराचा नव्हे, तर मनाच आरोग्य साजरा करण्याचा देखील आहे.





