“पुरुष माझ्याकडे आकर्षित होतात पण… ” ; अभिनेत्री दिव्या दत्ताने लग्न का केलं नाही? मांडला तिचा ‘पॅाइट अॅाफ व्ह्यूव’

Actress Divya Dutta : बॅालीवूडमधील अनेक स्टार कलाकारांनी अद्याप लग्न केलेले नाही. थोडक्यात ते विवाहबंधनात अडकलेले नाहीत. सलमान खान, सुष्मिता सेन हि त्या कलाकारांपैकी एक. बॅालीवूड इंडस्ट्रीमधील आणखी एक अभिनेत्री अशी आहे, जिने वयाची ४७ वर्षात पदार्पण केले तरीही लग्न केले नाही. तिने इतक्या वर्ष अविवाहित राहण्याबाबतचा मोठा खुलासा आणि आपले मत एका मुलाखती दरम्यान व्यक्त केले आहे.
मला लग्न करायचे नाही, पण मला असा जोडीदार नक्कीच हवा आहे ज्याच्यासोबत मी प्रवास करू शकेन. जर मला तो भेटला नाही तरी मी स्वतः आनंदी राहीन, असे तिने मुलाखती दरम्यान विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना सांगितले. मला कोणीतरी विचारले की तू अविवाहित का आहेस? तू सुंदर, आकर्षक, काळजी घेणारी आहेस, या प्रश्नावर उत्तर देताना दिव्या म्हणाली, तुमच्या आयुष्यात जोडीदार आल्यावरच तुम्ही पूर्ण व्हाल असे आवश्यक नाही. माझाही हा गैरसमज होता, असा लग्न न करण्याचा खुलासा दिव्याने केला.
View this post on Instagram
जर तुम्हाला चांगला जोडीदार सापडला तर लग्न करणे ही खूप चांगली कल्पना आहे. पण जर तुम्हाला तो मिळाला नाही तर आयुष्य सुंदरपणे पुढे जाते. पण बॅलेन्स नसलेल्या विवाहात अडकू नये, असा सल्लाही तिने दिला. बरेच पुरुष माझ्याकडे आकर्षित होतात आणि मला ते आवडते, असे म्हणत दिव्याने मनातली गोष्ट सांगितली. दिव्या दत्ताने आजवर अनेक चित्रपटांमध्ये लक्षवेधी भूमिका साकारलेल्या आहेत. छावा, मंटो, बदलापूर यासारख्या चित्रपटात तिने काम केले आहे.
हेही वाचा: बालिका वधू फेम अभिनेत्रीचा चाहत्यांना सुखद धक्का! गुपचुप उरकला साखरपुडा, सुंदर फोटो केले शेअर





