आठवण नाशिक साहित्य संमेलनाची: भुजबळांनी थेट पुणं गाठलं, नारळीकरांना आमंत्रण दिलं.. पण ते गेले नाहीत! कारण….

Jayant Narlikar | Chhagan Bhujbal | जेष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॅा. जयंत नारळीकर यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी पुण्यातील राहत्या घरी निधन झाले. आज पहाटे त्यांची झोपेतच प्राणज्योत मालवली. यामुळे विज्ञानविश्वात शोककळा पसरली आहे, तर दुसरीकडे राज्यभवनावर छगन भुजबळ यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यामुळे धनंजय मुंडे यांच्या रिकाम्या झालेल्या खुर्चीवर छगन भुजबळ यांची वर्णी लागली आहे. या खुर्चीवरून जयंत नारळीकर आणि छगन भुजबळ यांची एक जुनी आठवण ताजी झाली आहे.
घटना आहे २०२१ ची. नाशिकमध्ये ९४ वे अखिल भारतीय साहित्य संंमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमलनाचे अध्यक्ष दिवंगत ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर होते. तर या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ होते. प्रकृती ठीक नसल्याने नारळीकर यांचे स्वागत करण्यासाठी भुजबळ पुण्यात आले होते. भुजबळांनी नारळीकरांना चार्टर विमानाने साहित्य संमेलनाला हजेरी लावून भाषण करून लगेच जावा, अशी विनवणी केली होते. पण भुजबळांनी दिलेलं आमंत्रण नारळीकरांनी स्विकारलं नाही.
९४ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या पहिल्या दिवशी व्यासपीठावर एक खुर्ची रिकामी होती. याचे कारण म्हणजे प्रकृती स्थिर नसल्याने संमेलाध्यक्ष जयंत नारळीकर हे संमेलनस्थळी उपस्थित राहू शकले नाहीत. यामुळे भाषण वाचून दाखवलं/ऑडियो ऐकवली होती. आज, नारळीकर आपल्यातून कायमचे गेले आणि याच दिवशी छगन भुजबळ यांचा मंत्रीपदासाठी शपथविधी पार पडला. एकेकाळी नारळीकरांसाठी साहित्यसंमेलनात ठेवलेली रिकामी खुर्ची आणि आज भुजबळांसाठी रिकामी झालेली मंत्रिपदाची खुर्ची. हा योगायोग फक्त राजकीयच नाही, तर काळाच्या कोपऱ्यांतली एक खास नोंद बनून राहील आहे.




