Mehbooba Mufti : मेहबूबा मुफ्ती यांच्या अडचणीत वाढ; राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याप्रकरणी तक्रार दाखल
पीडीपी अध्यक्षा आणि जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती (Mehbooba Mufti) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Mehbooba Mufti : पीडीपी अध्यक्षा आणि जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती (Mehbooba Mufti) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. श्रीनगरमध्ये एका आंदोलनादरम्यान राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याचा आरोप करत त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करणारी पोलिस तक्रार बुधवारी जम्मूमध्ये दाखल करण्यात आली.
जम्मूतील पक्का दंगा पोलिस ठाण्यात ज्येष्ठ हृदयरोगतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. नीरज शर्मा यांनी ही तक्रार दाखल केली आहे. ऑगस्ट २०१९ मध्ये कलम ३७० आणि ३५-ए हटवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात मंगळवारी रात्री श्रीनगरमधील (Mehbooba Mufti) पीडीपी कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते.
या आंदोलनादरम्यान मेहबूबा मुफ्ती यांनी राष्ट्रध्वज उलटा (केसरी रंग खाली करून) धरल्याचा व्हिडिओ आणि फोटो समोर आले आहेत.
डॉ. शर्मा यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, राष्ट्रध्वज उलटा धरल्याने केवळ राष्ट्रध्वजाचाच अवमान झालेला नाही, तर देशातील सर्व देशभक्तांच्या भावनांना तीव्र ठेच पोहोचली आहे. याप्रकरणी राष्ट्रीय सन्मानाचा अवमान (Mehbooba Mufti) प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदवून तातडीने चौकशी करण्याची मागणी पोलिसांकडे करण्यात आली आहे.






