मेहबूबा मुफ्ती यांचे मोठे विधान ; म्हणाल्या,”मोदींच्या मनात आलं तर ते काश्मीर…”

MEHBOOBA MUFTI। जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानशी चर्चेचे संकेत दिले आहेत. पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) च्या २६ व्या स्थापना दिनानिमित्त श्रीनगरमध्ये एका जाहीर सभेला संबोधित करताना मुफ्ती यांनी , “जर मोदींना हवे असेल तर ते काश्मीर समस्या सोडवू शकतात. त्यांनी लाहोरला जाऊन प्रयत्न केले आणि जर त्यांना हवे असेल तर ते ते करू शकतात.” असे मोठे विधान केले आहे.
मेहबूबा मुफ्ती यांनी या कार्यक्रमाच्या वेळी, “मी दिल्ली सरकारला सांगू इच्छिते की, जम्मू आणि काश्मीरच्या लोकांना शांतता हवी आहे, पण आदराने. सैन्य आणून आणि लोकांना तुरुंगात टाकून शांती मिळणार नाही.” असे म्हणत सरकारवर टीका देखील यावेळी केली.
मोठ्या भावाची भूमिका साकारणे MEHBOOBA MUFTI।
मेहबूबा मुफ्ती पुढे म्हणाल्या “भारताने मोठ्या भावाची भूमिका बजावली पाहिजे आणि सर्वांशी बोलले पाहिजे. आपण युद्धाच्या उंबरठ्यावरून परत आलो आहोत आणि मला माहित नाही की आपण काय साध्य केले?” असे म्हणत त्यांनी ऑपरेशन सिंदुरवर भाष्य केले.
तसेच पुढे बोलताना, “मी परराष्ट्र मंत्र्यांना एक सवाल करू इच्छिते कि आपण जेव्हा जेव्हा बोलतो तेव्हा परराष्ट्र धोरणाचा उल्लेख करून आपल्याला गप्प केले जाते. जम्मू आणि काश्मीरशिवाय परराष्ट्र धोरण काय?” असेही त्यांनी यावली म्हटले.
मेहबूबा मुफ्ती यांची घोषणाबाजी
यावेळी मेहबूबा मुफ्ती यांनी शांततेचे नारे दिले. ते म्हणाले, “युद्धानंतर शस्त्रास्त्रांची स्पर्धा सुरू झाली. भारत आणि पाकिस्तानमध्ये अधिकाधिक शस्त्रास्त्रे खरेदी केली जात आहेत. पाकिस्तान कर्जात बुडाला आहे आणि आपण चीनशी स्पर्धा करू शकत नाही. मी हे म्हणत नाही, भारताचे परराष्ट्र मंत्री हे म्हणतात.” असे म्हणत त्यांनी जयशंकर यांच्यावर निशाणा साधला.
मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या, “मी परराष्ट्रमंत्र्यांना सांगू इच्छिते की आम्ही भारताच्या परराष्ट्र धोरणात हस्तक्षेप करत राहू कारण तुमची प्रत्येक लढाई काश्मीरमध्ये लढली जाते. मग ती पहलगाम हल्ला असो किंवा ऑपरेशन सिंदूर.
मुस्लिमांवर अत्याचार होत आहेत MEHBOOBA MUFTI।
पीडीपी प्रमुख मुफ्ती यांनी यावेळी,”देशात मुस्लिमांवर अत्याचार होत आहेत.” बांगलादेशी असल्याच्या आरोपावरून समुद्रात फेकले जात आहे. जर तुम्हाला आमची जमीन हवी असेल तर आम्हाला सांगा आणि आम्ही दुसरीकडे जाऊ.असे देखील त्यांनी यावेळी म्हटले.
त्यासोबतच त्यांनी, “जर भारताला जागतिक नेता बनायचे असेल, तर त्याला युद्धाबद्दल बोलणे थांबवावे लागेल आणि शांतता आणि सौहार्दाबद्दल बोलायला सुरुवात करावी लागेल. पीडीपी शांततेत देशाला पाठिंबा देऊ इच्छिते. आशिया कपमध्ये भारत पाकिस्तानसोबत खेळत आहे याचा मला खूप आनंद आहे.”असे त्यांनी आपल्या भाषणातून सांगितले.





