मेहबूब शेख प्रकरणाला वेगळे वळण! चित्रा वाघ यांचा संताप; शिवसेना नेत्याचे नाव घेत म्हणाल्या,”जेव्हा अशी राजकीय धेंडं येतात…”

Updated On:

मुंबई : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या बलात्काराच्या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे. या प्रकरणातील पीडितेने घुमजाव केल्याचे समोर आले आहे. भाजपा नेत्या चित्रा वाघ आणि आष्टीचे आमदार सुरेश धस यांच्या सांगण्यावरूनच आपण मेहबूब शेख यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केल्याचा खळबळजनक दावा पीडितेने केला आहे. पीडितेने केलेल्या या दाव्यामुळे आता चित्रा वाघ यांच्यावर संशय घेतला जात आहे. दरम्यान, त्यांनी स्वत: यासंदर्भात व्हिडीओ जारी करून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

“राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्याविरुद्ध ३१ डिसेंबर २०२० रोजी सिडको ठाण्यात दिलेली बलात्काराची तक्रार खोटी आहे. यासंदर्भाने रचलेल्या कटात भाजपा नेत्या चित्रा वाघ व आष्टीचे आमदार सुरेश धस आहेत. आपल्यावर शीतपेयात गुंगीचे औषध टाकून अत्याचार करून त्याची चित्रफित सर्वत्र पसरवण्याची व जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याने धस यांच्याकडून पैसे घेतले होते”, असा खळबळजनक दावा पीडितेने केला आहे.

दरम्यान, यासंदर्भात चित्रा वाघ यांनी एक व्हिडीओ संदेश जारी केला आहे. “मेहबूब शेखवर आरोप करणाऱ्या पीडितेनं घुमजाव करत चित्रा वाघ आणि सुरेश धस यांच्या सांगण्यावरून गुन्हा दाखल केल्याचे म्हटले आहे. यासंदर्भात आम्ही सर्व चौकशीला सामोरं जायला तयार आहोत. याआधीही शिवसेनेचा बलात्कारी नेता रघुनाथ कुचिक यानंही एका बलात्कारित पीडितेवर दबाव टाकला की चित्रा वाघ यांनी हे करायला भाग पाडले असे सांगावे. त्यानंतर त्या मुलीनं माझं नाव घेतलं. पण ८ ते १० दिवसांत सत्य समोर आलं”, असे चित्रा वाघ या व्हिडीओमध्ये म्हणाल्या आहेत.

“समाजकारणात काम करताना असे अनुभव आम्हाला नवीन नाहीत. आम्ही पहिल्या दिवसापासून तिला मदतच केली आहे. सर्व यंत्रणांना सहकार्य करण्याची आमची भूमिका असेल. असे अनुभव येतात म्हणून काम करणं आम्ही थांबवत नाहीत. ज्या ज्या ठिकाणी अशी राजकीय धेंडं येतात, तिथे अशी परिस्थिती उद्भवणं स्वाभाविक आहे. येणाऱ्या प्रत्येक चौकशीला सामोरं जाण्याची आमची तयारी आहे”, असे देखील चित्रा वाघ यांनी नमूद केले आहे.

३१ डिसेंबर रोजी मेहबूब शेख यांच्याविरुद्ध ठाण्यातल्या सिडको पोलीस ठाण्यात बलात्काराची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यावरून विरोधकांनी सरकारला आणि सत्ताधारी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य करण्यास सुरुवात केली होती. मात्र, या प्रकरणातील पीडितेनंच आपला जबाब बदलत चित्रा वाघ आणि सुरेश धस यांचे नाव घेतले आहे.

आणखी संबंधित बातम्या

Mithun Chakraborty : मिथुन चक्रवर्तींना मोठी जबाबदारी; कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा, मिळाले ‘हे’ पद

2026-10-07 22:22:29

Mithun Chakraborty : मिथुन चक्रवर्तींना मोठी जबाबदारी; कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा, मिळाले ‘हे’ पद

Rahul Gandhi : दिल्‍लीत दुसऱ्या दिवशीही हाय ड्रामा.! राहुल, प्रियांका गांधी यांना पुन्‍हा घेतले ताब्‍यात

2026-10-07 21:58:13

Rahul Gandhi : दिल्‍लीत दुसऱ्या दिवशीही हाय ड्रामा.! राहुल, प्रियांका गांधी यांना पुन्‍हा घेतले ताब्‍यात

Devendra Fadnavis : "एमपीएससी आंदोलन हायजॅक, ते पूर्णपणे राजकीय बनले आहे" - मुख्यमंत्री फडणवीस

2026-10-07 20:57:05

Devendra Fadnavis : "एमपीएससी आंदोलन हायजॅक, ते पूर्णपणे राजकीय बनले आहे" - मुख्यमंत्री फडणवीस

Oil tanker attack : काळ्या समुद्रातल्या तेलाची वाहतूक करणाऱ्या जहाजावर हल्ला; भारताच्या २३ कर्मचाऱ्यांची सुटका

2026-10-07 19:39:08

Oil tanker attack : काळ्या समुद्रातल्या तेलाची वाहतूक करणाऱ्या जहाजावर हल्ला; भारताच्या २३ कर्मचाऱ्यांची सुटका

State Name Change : थेट राज्याचं नावच बदलणार? भाजप प्रदेशाध्यक्षांचा मोठा दावा, नवं नावही सुचवलं

2026-10-07 19:26:25

State Name Change : थेट राज्याचं नावच बदलणार? भाजप प्रदेशाध्यक्षांचा मोठा दावा, नवं नावही सुचवलं