पुणे-मुंबई महामार्गावर आज मेगाब्लॉक
Updated On:
पुणे – महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या वतीने पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर गॅन्ट्री बसविण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे उद्या (गुरुवारी) 12 ते 2 या वेळात या महामार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यानुसार मुंबईकडे जाणारी वाहतूक जुन्या पुणे- मुंबई महामार्गाने वळविण्यात येणार आहे, तर या कालावधीत अवजड वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद ठेबण्यात येणार आहे. मात्र, हा बदल केवळ मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांसाठी असणार आहे. तर पुण्याकडे येणारी वाहतूक नियमितपणे सुरू असणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन महामार्ग पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.





