ICC Women’s T-20 World cup : मेग लेनिंगने धोनी व पॉंटिंगलाही टाकले मागे; #T20WorldCup मध्ये केला खास विक्रम

केपटाऊन – ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत रविवारी महिलांच्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेचे विक्रमी सहावे विजेतेपद पटकावले. त्यात ऑस्ट्रेलियाची कर्णधार मेग लेनिंग हिने एक अनोखी कामगिरी करताना भारताच्या पुरुष क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी व ऑस्ट्रेलियाचा कर्णधार रिकी पॉंटिंग यांच्या कामगिरीला मागे टाकले आहे. (Meg Lanning races ahead of Ricky Ponting and MS Dhoni, reacts to Australia’s 6th World T20 title) पॉंटिंगने चार वेळा विश्वकरंडक स्पर्धा आपल्या नेतृत्वात जिंकली. ही कामगिरीही लेनिंगने मागे टाकली. तसेच धोनीने आयसीसीच्या तीन मोठ्या स्पर्धांचे विजेतेपद मिळवून दिले होते, त्या कामगिरीलाही लेनिंगने मागे टाकले.
ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने 2010, 2012, 2014, 2018, 2022, 2023 अशी सहावेळा विजेतेपद मिळवले आहे. तसेच लेनिंग आपलीच संघ सहकारी एलिसा हिली यांच्या नावावर टी-20 विश्वकरंडकातील सर्वाधिक 10 अंतिम लढती खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या खेळाडू देखील बनल्या.
संघ बनले मालामाल
– आयसीसीकडून सर्व संघांना 20.31 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचे वाटप
– विजेत्या ऑस्ट्रेलियाला 8.29 कोटी
– उपविजेत्या दक्षिण आफ्रिकेला 4.14 कोटी
– गट साखळीतील प्रत्येक संघाला 14.51 लाख
भारतीय संघही लक्षाधीश
या स्पर्धेत उपांत्य फेरीत स्थान मिळवलेल्या संघांनाही आयसीसीने मोठी रक्कम दिली आहे. उपांत्य फेरीत खेळलेल्या भारत व इंग्लंड या दोन्ही संघांना प्रत्येकी 1.74 कोटी रुपये दिले जाणार आहेत.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/harmanpreet-expressed-her-regret-after-losing-the-womens-world-t20-cricket-tournament/
तसेच साखळीत भारतीय संघाने तीन सामने जिंकले होते. त्यामुळे भारतीय संघाला अतिरीक्त 43 लाख रुपयेही मिळतील. म्हणजेच भारतीय महिला संघाला एकूण 2.17 कोटी रुपये मिळणार आहे






