नवी दिल्ली : सत्ताधारी भाजपाच्या सुधारीत नागरिकत्व कायदा (का) आणि राष्ट्रीय नागरिकत्व सुची (एनआरसी) यांना विरोध करण्यासाठी विरोधी पक्षांची नवी दिल्लीत बैठक झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी होत्या. मात्र तृणमूल कॉंग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी आणि बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांनी या बैठकीकडे पाठ फिरवली. प्रादेशिक पक्षांनी या बैठकीला न गेल्याने विरोधकांच्या ऐक्यात बाधा आली.
राजस्थानात बसपाने पाठींबा देऊनही कॉंग्रेसने आमचे आमदार फोडले. त्यामुळे या बैठकीला उपस्थित राहिल्यास राजस्थानमधील पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मनोबलावर परिणाम होईल, असा दावा करत मायावती यांनी या बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचे सांगितले.
राज्यात कॉंग्रेस आणि कम्युनिस्ट सरकारविरोधात प्रचार करत आहेत. त्यांची का आणि एनआरसी विरोधाची भूमिका दूटप्पी आहे, असे सांगून या बैठकीला जाणार नसल्याचे तृणनूलच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी सांगितले.
मात्र त्या बैठकीला डीएमकेची अनुपस्थिती सर्वांना खटकणारी ठरली. कारण एम के स्टॅलीन यांनी पक्षाची सूत्रे त्यांच्या पक्षाने रालोआपासून दोन हात लांब राहण्याला प्राधान्य दिले आहे. मात्र त्यांनी ही या बैठकीकडे पाठ फिरवली. शिवसेनेनेही या बैठकीला अनुपस्थित रहात आपली वाट स्वतंत्र असल्याचे संकेत दिले. आपनेही या बैठकीला दांडी मारत दिल्लीच्या रणांगणावर लक्ष केंद्रीत केले.