मेदनकरवाडी येथे अंगणवाडी सेविकांचा मेळावा संपन्न
Updated On:

पुणे – जिल्ह्यातील मेदनकरवाडी तर्फे चाकण येथे खेड प्रकल्पातील अंगणवाडी सेविकांचा मेळावा संपन्न झाला. यावेळी मेळाव्यात 75 सेविका व मदतनीस उपस्थित होत्या.
सुषमा जानवेकर, जिल्हा सचिव रजनी पिसाळ व राज्य महासचिव शुभा शमीम यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या समस्या व मागण्या, संघटनेची कार्यपद्धती, शासनाची धोरणे इत्यादी विषयांवर मार्गदर्शन केले. पंचशीला कडलक यांनी प्रास्ताविक केले.
प्रकल्प कमिटीची निवड करून मेळाव्याची सांगता करण्यात आली. अंगणवाडी कर्मचारी संघटनाच्या वतीने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.





