मुंबईत मुख्यमंत्री ठाकरे आणि शरद पवार यांच्यात बैठक सुरु
Updated On:

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस झपाट्याने वाढतच आहे. त्यातही पुणे आणि मुंबईमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच आहे. यावर उपाययोजना काय करता येतील याच पार्श्वभूमीवर आज मुंबई बैठक घेण्यात येत आहे.
मुंबईत सध्या सुरु असणाऱ्या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँगेसचे सर्वेसर्वा शरद पवार, राज्य गृहमंत्री अनिल देशमुख, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित आहेत. कोरोना आणि राज्याची आर्थिक स्थिती याबद्दल बैठकीत चर्चा करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.





