वाघोली – वाघोली येथे दारूस्सलाम चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने जनसेवा पॉलिक्लिनिक ऍन्ड डायग्नोस्टिक सेंटरचे उद्घाटन लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित काइंगडे यांचे हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. जनसेवा पॉलीक्लिनिकच्या माध्यमातून सर्वसामान्यांना विविध वैद्यकीय उपचार अल्पदरात मिळणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते सनी अन्सारी यांनी दिली आहे. महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून पॉलीक्लिनिक ऍन्ड डायग्नोस्टिक सेंटरच्या चौथ्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले. केसनंद फाटा येथे भैरवनाथ जवळील शेटीया कॉम्प्लेक्समध्ये पहिल्या मजल्यावर असलेल्या जनसेवा पॉलीक्लिनिकच्या माध्यमातून तज्ञ डॉक्टरांकडून जनसामान्यांना अल्पदरात सेवा दिली जाणार आहे. यामध्ये रेग्युलर ओपीडी 50 रुपयांमध्ये औषधीसह मिळणार आहे. स्पेशल ओपीडी 150 रुपयांमध्ये तर रुग्णवाहिका सेवेमध्ये 50 टक्क्यांची सूट मिळणार आहे. तसेच सिटी स्कॅन, एमआरआय, सोनोग्राफी व लबद्वारे केल्या जाणाऱ्या टेस्टमध्ये सुद्धा 50 टक्के सूट दिली जाणार असल्याची माहिती ट्रस्टचे संस्थापक मौलाना शकील यांनी दिली. यावेळी डॉ. राशिद मलीक, डॉ. वैष्णवी शिर्शिकर, जि. प. सदस्य ज्ञानेश्वर कटके, माजी उपसरपंच राजेंद्र सातव पाटील. माजी उपसरपंच समीर भाडळे, सुनील जाधवराव, बापू हरगुडे, संपत गाडे, ललित भाडळे, आप्पा अन्सारी, रहीम शेख, अप्पालाल शेख, डॉ. जावेद इनामदार, डॉ. हरून अन्सारी, विलास शिंदे, ऍड. गणेश म्हस्के, निसार शेख, अक्रम सय्यद, मौलाना शकील, सचिन वाघमारे, सुधीर भाडळे, नईम शेख, शंकर शिंदे, सूरज गाडे, मौलाना झिया रहमान, फहिम अन्सारी, हाजी इम्तियाज आदी मान्यवर उपस्थित होते.