मेधा पाटकर यांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेला स्थगिती

नवी दिल्ली : दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही के सक्सेना यांनी २३ वर्षांपूर्वी केलेल्या मानहानीच्या खटल्यात नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांना सुनावलेल्या पाच महिन्यांच्या साध्या कारावासाच्या शिक्षेला येथील न्यायालयाने सोमवारी स्थगिती दिली आणि पाटकर यांना २५ हजार रुपयांच्या जामीनाच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.
पाटकर यांनी दाखल केलेल्या अपीलावर, महानगर दंडाधिकारी राघव शर्मा यांनी शिक्षेला स्थगिती दिली आणि विरुद्ध पक्षाला (एलजी) नोटीसही जारी केली, असे सक्सेना यांचे वकील गजिंदर कुमार यांनी सांगितले. याप्रकरणी न्यायालयाने पाटकर यांना 1 जुलै रोजी तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती.
पाटकर यांनी सक्सेना यांना भ्याड आणि हवाला व्यवहारात त्यांचा सहभाग असल्याचा आरोप करणारी त्यांची विधाने केवळ बदनामीकारकच नाहीत, तर त्यांच्याबद्दल नकारात्मक समज निर्माण करण्यासाठी रचण्यात आल्याचे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने पाटकर यांना 24 मे रोजी दोषी ठरवले होते.





