\n

गाजियाबाद भाजपाचे जिल्हा सचिव संजीव झा यांनी तक्रार दाखल केली होती त्यावरून मेधा पाटकर या मुख्य विश्वस्त असलेल्या नर्मदा नवनिर्माण अभियान या सेवाभावी संस्थेविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. 2005 साली आंदोलनासाठीच्या पैशांमधून मनी लॉण्ड्रींगच्या माध्यमातून राजकीय षडयंत्र रचल्याचा आरोप झा यांनी केला होता.

\n

मेधा पाटकर म्हणाल्या की, नर्मदा नवनिर्माण अभियानाअंतर्गत मागील अनेक वर्षांपासून तिन्ही राज्यांमध्ये नर्मदेच्या खोऱ्यात काम करत आहे. वेगवेगळ्या मुद्द्यांवर आणि लोकांच्या समस्यांवर काम करणाऱ्या या अभियानाबद्दल एक खळबळजनक बातमी मागील तीन चार दिवसांपासून पसरवण्यात गेली आहे, आमच्यावर जो आरोप लावण्यात आलाय तो धादांत खोटा असल्याचं आमचं स्पष्ट मत आहे. त्यांनी असं दाखवलंय की 20 लोकांकडून एकच राशी आम्हाला एकाच दिवशी मिळाली. पण हे काही आमच्या कागदपत्रांवरुन सिद्ध होत नाहीय. आम्हाला हे मान्य नाही. ही राशी कुठे मिळाल्याचंही आम्हाला आढळलेलं नाही. असे पाटकर म्हणाल्या आहेत.

\n

याबरोबरच माझगाव डॉक या सर्वाजनिक उद्योगाने नर्मदा नवनिर्माण अभियानासाठी जी राशी दिली होती त्याही बद्दल शंका कुशंका उपस्थित केल्यात. प्रत्यक्षात माझगाव डॉकने आम्हाला जो सहय्योग दिला तो भूतपूर्व जिल्हाधिकारी नंदूरबार यांनी केलेल्या शिफारशीवरुन दिला. माझगाव डॉकने नंदूरबार जिल्ह्यामध्ये अनेक प्रकल्पांना अनेक प्रकारची मदत दिली आहे. त्यांनी आमच्या जीवन शाळेतील छात्रालयामधील शेकडो विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी दोन वर्षांसाठी मदत दिली. आधी काही काळासाठी नंतर येऊन, बघून, समाधान व्यक्त करुन ती मदत अधिक काळासाठी दिली गेली. त्यामुळे आम्हाला नक्कीच सहयोग मिळाला. पण त्याचा कुठेही गैरवापर न होता त्याचे अकाऊंट्स, त्याचे ऑडिट, त्याचे रिपोर्ट सर्वकाही माझगाव डॉकला प्रस्तुत केले गेले. त्यांनी मुल्यांकनही केले. त्यांच्या वार्षिक अहवालामध्ये याचा उल्लेख आहे. असे पाटकर यांनी स्पष्ट केले आहे.

\n

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, हे जे काही कारस्थान चालले आहे ते आमच्या जन आंदोलनाला आणि संघर्ष निर्माण कार्याला बदनाम करण्यासाठी म्हणून केलेले आहे. व्यक्तीश: माझ्याविरोधात आणि आंदोलनाविरोधात अशाप्रकारची एक केस दाखल झाली होती, असे म्हणत या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने ही केस रद्द करत याचिका कर्त्याला दंड केला होता. सध्याच्या प्रकरणामध्ये सर्व सहकार्य आम्ही करु असेही त्यांनी म्हटले आहे. यावेळेला आम्ही पुढे जी काही कारवाई होईल, चौकशी झाली तर त्यामध्ये सहय्योग देऊ परंतू योग्य ती कायदेशीर कारवाई केल्याशिवाय राहणार नाही.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"EDच्या कारवाईनंतर मेधा पाटकर यांची पहिली प्रतिक्रिया म्हणाल्या… (व्हिडिओ)","thumbnailUrl":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2022/04/medha-patkar.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/amolwarankareprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/medha-patkars-first-reaction-after-eds-action-said#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2022/04/medha-patkar.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/medha-patkars-first-reaction-after-eds-action-said#webpage","name":"EDच्या कारवाईनंतर मेधा पाटकर यांची पहिली प्रतिक्रिया म्हणाल्या… (व्हिडिओ)","url":"https://www.dainikprabhat.com/medha-patkars-first-reaction-after-eds-action-said","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/medha-patkars-first-reaction-after-eds-action-said#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2022/04/medha-patkar.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/medha-patkars-first-reaction-after-eds-action-said#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/medha-patkars-first-reaction-after-eds-action-said","name":"EDच्या कारवाईनंतर मेधा पाटकर यांची पहिली प्रतिक्रिया म्हणाल्या… (व्हिडिओ)"}}]}}}

EDच्या कारवाईनंतर मेधा पाटकर यांची पहिली प्रतिक्रिया म्हणाल्या… (व्हिडिओ)