यांत्रिक मासा करणार प्लॅस्टिकचे निर्मूलन; वैज्ञानिकांनी लावला फिश रोबोटचा शोध

बीजिंग – प्लास्टिकचे निर्मूलन कसे करायचे हा संपूर्ण जगापुढे निर्माण झालेला प्रश्न आहे आता चीनमधील वैज्ञानिकांनी याच्यावर उपाय शोधला असून समुद्रातील प्लास्टिकचे निर्मूलन करण्यासाठी एका फिश रोबोटचा म्हणजेच यांत्रिक माशाचा शोध लावला आहे हा यांत्रिक मासा समुद्रात सोडताच प्लास्टिकचे निर्मूलन करेल तेरा एम एम लांबीचा हा मासा आपल्या शरीरावर पाच किलो पेक्षा जास्त प्लास्टिकचा भार सहन करू शकतो चीनमधील सिच्युअन विद्यापीठाच्या संशोधकांनी या अनोख्या माशाचा शोध लावला आहे.
हा मासा समुद्रात सोडताच तो समुद्राच्या तळाशी किंवा इतरत्र जमलेले मायक्रो प्लास्टिकचे कण गोळा करून इतरत्र वाहून नेऊ शकतो 5 मिलिमीटर किंवा त्याच्यापेक्षा कमी आकाराचे प्लास्टिकचे तुकडे नष्ट करणे हे एक मोठे आव्हान असते पण या रोबोट माशावर ती जबाबदारी देण्यात आली येणार असून समुद्रात पसरलेले प्लास्टिकचे बारीक कण गोळा करण्यात येणार आहेत.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या माशाची निर्मिती करण्यात आली असून समुद्रात काम करत असताना त्याच्यावर समुद्रातील वातावरणाचा परिणाम होऊन जर हा मासा बिघडला तर स्वतःला तो आपोआप दुरुस्त करू शकणार आहे जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारी प्रमाणे समुद्रात दरवर्षी पन्नास लाख ते 1 कोटी मेट्रिक टन पर्यंतचा प्लास्टिक कचरा मिसळला जातो.



