Mi Punha Yein Trailer Release: अभूतपूर्व सत्तानाट्याचा थरार उलगडणाऱ्या ‘मी पुन्हा येईन’चा ट्रेलर रिलीज

मुंबई – काही दिवसांपूर्वी ‘मी पुन्हा येईन’ या सिरींजचा टिझर रिलीज करण्यात आला होता. त्यानंतर या टीजरचे सध्याच्या राजकीय घडामोडींशी अनेक तर्क वितर्क लावले जात होते. आता या सिरींजचा ट्रेलर समोर आला आहे. राजकारणावर भाष्य करणाऱ्या या सिरीजमध्ये सयाजी शिंदे, उपेंद्र लिमये, सिद्धार्थ जाधव, रूचिता जाधव, भारत गणेशपुरे असे मातब्बर कलाकार असल्याचे पाहायला मिळते.
काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या होत्या. मी पुन्हा येईन या राजकीय वेब सिरींजचा ट्रेलर पाहताना सध्याच्या घडामोडींचे जणू प्रतिबिंबच असल्यासारखे वाटत आहे. विनोदी शैलीत मारलेले डायलॉग ट्रेलर असूनही सहजतेने लक्षात राहतात. मराठीमध्ये पहिल्यांदाच अशा विनोदी पद्धतीने राजकारणावर भाष्य होणार असलयाचे या निमित्ताने दिसते.
सत्ता टिकवण्यासाठी राजकारण्यांना करावी लागणारी धडपड,आमदारांची पळवापळवी, सत्ताकारण असे अनेक पैलू या सीरिजमधून उलगडणार आहेत. प्लॅनेट मराठी या ओटीटी प्लँटफॉर्मवर ही सिरीज लवकरच रिलीज होणार आहे. राजकीय पटावरील सत्तानाट्याचा थरार यानिमित्ताने मराठीमधून पाहता येणार आहे.





