Mayor Manjusha Nagpure : वारकऱ्यांच्या सोईसाठी प्रशासन सज्ज!
Mayor Manjusha Nagpure :

महापौर मंजुषा नागपुरे; पालखी विठोबा मंदिर स्थळाची पाहणी
Mayor Manjusha Nagpure : पुणे मुक्कामी वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी महापालिका सज्ज असल्याचे महापौर मंजुषा नागपुरे यांनी पत्रकारांना सांगितले. नागपुरे यांनी मंगळवारी पालखी विठोबा मंदिर परिसरातील पालखी मुक्काम नियोजनाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
पालखी विठोबा मंदिराच्या आजूबाजूच्या मिळकती ताब्यात घेतल्या आहेत. हा परिसर मोठा करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, तो पूर्वीपेक्षा अधिक मोठा झाला आहे. वारकरी, भाविक येथे दर्शनासाठी आल्यावर त्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये या पद्धतीनेच नियोजन केले जात आहे, असे नागपुरे म्हणाल्या.
पुण्यामध्ये वारकरी सोमवारपासूनच दाखल झाले आहेत. पुण्यातील मुक्कामात ते ज्या शाळांमध्ये राहतात त्या शाळा त्यांना खुल्या करून दिल्या आहेत. पाणीकपात रद्द करून पाणी पुरवठा सुरळीत करून दिला आहे.
जेथे अन्नपुरवठा करावा लागणार आहे तेथे मंडळाचे कार्यकर्ते मदत करीत आहेत. त्यांच्या जेवणाची व्यवस्था करून दिली आहे. तसेच, प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी नियोजन करूत आहेत. सगळी यंत्रणा सज्ज आहे. जेथे पावसामुळे पाणी साचले आहे ते काढण्याचे कामही सुरू आहे, असे नागपुरे यांनी नमूद केले.





