“माझ्यावर जो प्राणघातक हल्ला झाला…” ; ३० वर्षांपूर्वीच्या घटनेचा संदर्भ देत मायावतींचा अखिलेश यादवांवर हल्लाबोल

Mayawati on Akhilesh Yadav । उत्तर प्रदेशातील आग्रा याठिकाणी समाजवादी पक्षाचे राज्यसभा खासदार रामजी लाल सुमन यांच्या घरावर हल्ला झाला होता. त्यावरून बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यावर मोठा हल्लाबोल केला आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट करत मायावतींनी ३० वर्षे जुन्या घटनेचा संदर्भ देत त्यांनी कन्नौजच्या खासदाराला पश्चात्ताप करण्याची मागणी केली आहे.
‘त्या’ घटनेबद्दलही पश्चाताप व्यक्त करावा Mayawati on Akhilesh Yadav ।
मायावती यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. त्यामध्ये त्यांनी,”आग्रा येथील घटनेसोबतच, सपा प्रमुखांनी त्यांच्या सरकारच्या काळात २ जून १९९५ रोजी लखनौ स्टेट गेस्ट हाऊस घटनेत या पक्षाने माझ्यावर केलेला प्राणघातक हल्ला देखील लक्षात ठेवावा आणि त्याबद्दल पश्चात्तापही करावा.” असे म्हटले आहे.
1. आगरा की हुई घटना के साथ-साथ सपा मुखिया को इनकी सरकार में दिनांक 2 जून 1995 को लखनऊ स्टेट गेस्ट हाऊस काण्ड में इस पार्टी द्वारा मेरे ऊपर कराया गया जानलेवा हमला भी इनको जरूर याद कर लेना चाहिये तथा इसका पश्चताप भी जरूर करना चाहिए। (1/2)
— Mayawati (@Mayawati) March 28, 2025
पुढे बोलताना त्यांनी म्हटले आहे कि, “आता समाजवादी पक्षाने आग्रा घटनेच्या नावाखाली राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न थांबवावा आणि आग्रामध्ये घडलेल्या घटनेप्रमाणे दलितांवर आणखी अत्याचार होऊ देऊ नयेत.” अशी मागणी देखील त्यांनी वेळी केली आहे.
आग्रा येथील घटना अत्यंत चिंताजनक Mayawati on Akhilesh Yadav ।
याआधी गुरुवारीही बसपा प्रमुखांनी या मुद्द्यावर आपले मत व्यक्त केले होते. त्यांनी म्हटले होते की, “सपा स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी दलित नेत्यांना पुढे करून, म्हणजेच त्यांना नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करून जे घाणेरडे राजकारण करत आहे, ते योग्य नाही. दलितांनी त्यांच्या सर्व डावपेचांपासून सावध राहिले पाहिजे. आग्रा येथील घटना अतिशय चिंताजनक आहे.





