मुंबई – दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेता ‘थलापती विजय’ (Thalapathy Vijay) चा मोठा चाहता वर्ग आहे. त्याच्या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. सध्या त्याच्या ‘लियो’ (Leo) या चित्रपटाची प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. नुकतेच या चित्रपटाने एक नवा विक्रम रचला आहे. हा चित्रपट रिलीज होण्याआधीच विक्रम करत आहे. आता लियो चित्रपटाने बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा देखील विक्रम मोडला आहे.
काही दिवसांपूर्वी भारतात आणि परदेशातही या सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली आहे. त्यानंतर आता ‘लियो’ चित्रपट यूकेमध्ये सर्वाधिक ओपनिंग करणारा भारतीय सिनेमा ठरला आहे. रिलीजच्या पहिल्याच दिवशी अॅडव्हान्स बुकिंगमध्ये या सिनेमाने मोठा गल्ला जमावला आहे.
यापूर्वी शाहरुख खानच्या सिनेमांनी यूकेमध्ये सर्वाधिक ओपनिंग कलेक्शन जमवले होते. शाहरुखच्या ‘पठाण’ने रिलीजच्या दिवशी 3 कोटी 22 लाख रुपयांची कमाई केली होती. तर ‘लियो’ने पहिल्या दिवशी आतापर्यंत 3 कोटी 23 लाखांची कमाई केली आहे.
दरम्यान, संजय दत्त लियो चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. थलपति विजय आणि संजय दत्त व्यतिरिक्त अलावा तृशा, मैसस्किन, गौतम वासुदेव मेनन, अनुराग कश्यप, अर्जुन तसेच मंसूर अली खान हे या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ‘लिओ’ येत्या 19 ऑक्टोबर रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.