Nilesh Rane-Vaibhav Naik। राज्यात महाविकास आघाडीला आणखी एक मोठा धक्का बसलाआहे. कुडाळ नगरपंचायत पोटनिवडणुकीत विद्यमान आमदार निलेश राणे यांनी मविआचा एक नगरसेवक फोडत माजी आमदार वैभव यांना मोठा झटका दिला आहे. भाजपच्या प्राजक्ता बांदेकर 9 मतं मिळवून नगराध्यक्षपदी विराजमान झाल्या आहेत. तर, महाविकास आघाडीच्या सई काळप यांचा एका मताने पराभव झाला असल्याची माहिती समोर येत आहे. राणेंना मविआचा एक नगरसेवक फोडण्यात यश Nilesh Rane-Vaibhav Naik। कुडाळमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला निलेश राणे यांचा धक्का देत शिवसेना आमदार निलेश राणे यांनी भाजपचा नगराध्यक्ष निवडून आणला आहे. भाजपच्या प्राजक्ता बांदेकर शिरवळकर यांनी मविआच्या सई काळप यांना पराभूत केलं. निवडणुकीअगोदर मविआकडे 9 तर महायुतीकडे 8 नगरसेवक होते. मात्र, निलेश राणे यांना मविआचा एक नगरसेवक फोडण्यात यश आलं आणि महायुतीचा नगराध्यक्ष निवडून आणाल. सिंधुदुर्गात आगामी काळात जिल्हा परिषद, नगरपालिकाच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसाठी कुडाळ ची नगराध्यक्ष पदाची निवडणूक नांदी ठरेल. पुढच्या सर्व निवडणुकात महायुतीच्या माध्यमातून आम्ही विजय मिळवू अशा प्रकारचा दावा आमदार निलेश राणे यांनी केला आहे. कुडाळ नगरपंचायतीतील नगराध्यक्ष निवडीनंतर निलेश राणे यांनी कार्यकर्त्यांसह आनंदोत्सवात सहभाग घेतला होता. यानंतर बोलताना राणे म्हणाले,अडीच वर्ष कुडाळ शहराचा विकास रखडला होता आणि म्हणूनच इथला महविकास आघाडीचा एक नगरसेवक फुटला आहे. आता खऱ्या अर्थाने कुडाळचा विकास होईल. दरम्यान, कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर निलेश राणे समर्थकांनी जल्लोष केला. वैभव नाईक यांना दुसरा धक्का Nilesh Rane-Vaibhav Naik। नोव्हेंबर महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत वैभव नाईक यांना पराभव स्वीकारावा लागला होता. निलेश राणे यांनी शिवसेनेत प्रवेश करुन निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत निलेश राणेंनी विजय मिळवला. त्यापाठोपाठ आता कुडाळच्या नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत मविआचा एक नगरसेवक फोडत निलेश राणेंनी वैभव नाईक यांना दुसरा धक्का दिला आहे. हेही वाचा महत्वाची बातमी ! येत्या १ एप्रिलपासून महामार्गांवरील प्रवास महागणार ; ‘इतक्या’ रुपयांनी वाढणार टोल टॅक्स ?