Maval Suicide Case : काळजाचा थरकाप! इमारतीच्या ८ व्या मजल्यावर महिला लटकली; वाचवण्यापूर्वीच हात सुटला अन्…
Maval Suicide Case : कातवी येथील व्हीटीपी अर्बन लाईफ सोसायटीतील घटना; घरगुती वादातून ३४ वर्षीय महिलेने टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय.

Maval Suicide Case – घरगुती भांडणाच्या कारणावरून एका ३४ वर्षीय महिलेने इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (दि. ९ मे) दुपारी दीड वाजताच्या सुमारास मावळ तालुक्यातील कातवी येथे व्हीटीपी अर्बन लाईफ या सोसायटी मध्ये घडली. प्रतिभा मनीष शंकर (वय ३४, रा. व्हीटीपी अर्बन लाईफ सोसायटी, कातवी, मावळ) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रतिभा शंकर या शनिवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास त्यांच्या घराच्या बाल्कनीत आठव्या मजल्यावर लटकलेल्या सोसायटी मधील नागरिकांना दिसल्या. त्या काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होत्या. नागरिकांनी गॅलरी मध्ये जाऊन त्यांना हात देण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रतिभा यांचा हात निसटला आणि त्या आठव्या मजल्यावरून खाली पडल्या.
या घटनेत प्रतिभा यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान प्रतिभा यांनी घरगुती वादातून हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.





