मौनी रॉयला झाली लगीन घाई

बॉलिवूड आणि टिव्ही सिरीयलमधून आपल्या खुबसूरतीचे जलवे दाखवणाऱ्या मौनी रॉयचा कोण बॉयफ्रेंड असेल, याची तमाम गॉसिप गॅंगला उत्सुकता लागून राहिली आहे. मात्र आपण अजूनही सिंगल आहोत, हे मौनी रॉयने यापूर्वी अनेकदा स्पष्ट केले आहे. मात्र आता तिच्या या वक्तव्यातील फोलपणा समोर आला आहे. सूरज नांबियार नावाच्या देखण्या युवकाबरोबर मौनी रॉयचे बऱ्याच दिवसांपासूनचे रिलेशन आहे आणि त्याच्याबरोबर ती लवकरच विवाहबद्ध होणार आहे, असे समजले आहे.
View this post on Instagram
सूरज नांबियार हा दुबईस्थित बॅंकर आहे. त्याच्या कुटुंबीयांशीही मौनी रॉयचे चांगले संबंध आहेत. आता विवाह केला पाहिजे असे मौनीला वाटायला लागले आहे. मात्र तिने स्वतः याबाबत अधिकृतपणे कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. मात्र तिने सूरज नांबियारबरोबरचे आणि त्याच्या कुटुंबीयांबरोबरचे काही फोटो सोशल मिडीयावर शेअर केले आहेत.
View this post on Instagram
तिच्या काही फोटोंमध्ये सूरजच्या आई-वडिलांचा उल्लेख तिने “मॉम’ आणि “डॅड’ असा केला आहे. त्यावरून ही गोष्ट स्पष्ट होते आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सूरजच्या अपार्टमेंटमध्येच मौनी शूटिंग करत होती. तेंव्हाच या नात्याबाबत पब्लिकला समजले होते. मात्र मौनीने त्याबाबत अधिकृतपणे काही भाष्य केले नव्हते. “नागिन’ फेम मौनी आता लवकरच आपल्या लग्नाची अधिकृत घोषणा करेल. पण तोपर्यंत ही बातमी सगळ्यांना समजलेली असेल.





