Pune District | वाघोली परिसरात कटकेंचा हटके विजयोत्सव

वाघोली, – शिरूर हवेली विधानसभा निवडणुकीत माऊली कटके यांनी जवळपास ७५ हजार मतांची आघाडी घेत मिळवलेल्या विजयात वाघोली गावातून कटके यांना २१ हजार मतांची आघाडी मिळाली आहे. आमदार माऊली कटके यांच्या निवडीचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले आहे.
पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे, पंचायत समितीचे माजी सभापती नारायण आव्हाळे, माजी पंचायत समिती सदस्य सर्जेराव वाघमारे, हिंदकेसरी अभिजीत कटके, भाजपचे संदिप भोंडवे, संदीप सातव, शाम गावडे, माजी उपसरपंच महेंद्र भाडळे, अनंता कटके, समीर भाडळे, अनिल सातव, संपत गाडे, दिलीप काळे, गणेश गोगावले, विजय जाचक, आदींनी मोठ्या उत्साहात कटके यांचा सत्कार करून स्वागत केले.
सामाजिक कार्यकर्ते विलास कंद यांनी या निवडणूकीत कटके यांच्या पाठीराखा म्हणून उत्तम जबाबदारी पार पाडली. शिरूर हवेलीच्या आमदारांचा निवासाचा पत्ता आता मुक्काम पोस्ट वाघोली, तालुका हवेली असा असणार असल्याने मुक्काम पोस्ट वाघोली अशी पोस्ट सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात चर्चेला आली आहे. महायुतीने मिळवलेल्या विजयात शिरूर हवेलीमध्ये नवा इतिहास घडवण्यात कटके यांनी सर्वसामान्य कार्यकर्ते नागरिक महिला व बंधू-भगिनींचे कटके यांनी आभार मानून आपला विजय तालुक्यातील सर्वांना समर्पित केला आहे.
स्व. बाबूराव पाचर्णे, स्व. अण्णासाहेब मगर यांच्या प्रेरणेने ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाने या पुढील काळात तालुक्यात विकास कामांची नवीन यशोगाथा लिहिली जाणार असल्याची भावना कार्यकर्त्याकडून व्यक्त केली जात आहे. आगामी पुणे महानगरपालिका आणि जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये कटकेंचा हा विजय हटके ठरू शकतो अशी चर्चा सध्या तालुक्यात जोरदार रंगू लागली आहे. दोन्ही तालुक्यातील मिळालेले मताधिक्य सध्या चर्चेला आले आहे.





