“वक्फ कायदा मुस्लिमांसाठी फायदेशीर, मशिदी-मदरसे सुरक्षित” ; ‘या’ मुस्लिम नेत्याचे वक्तव्य
Updated On:

Maulana Barelvi । अखिल भारतीय मुस्लिम जमातचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना शहाबुद्दीन रझवी बरेलवी यांनी, “वक्फ सुधारणा कायदा मुस्लिमांसाठी हानिकारक नसून फायदेशीर आहे. काही राजकीय नेते मशिदी आणि मदरसे हटवले जातील, अशी अफवा पसरवून मुस्लिमांना दिशाभूल करत आहेत, परंतु कायद्यात असे काहीही नाही. उलट, हे प्रकरण मुस्लिमांमध्ये गोंधळ निर्माण करून त्यांना भडकवण्याचा प्रयत्न आहे.” असे म्हटले आहे.
वक्फ कायद्याचे भय बाळगण्याची गरज नाही Maulana Barelvi ।
मौलाना बरेलवी यांनी मुस्लिमांना आवाहन केले की, “वक्फ कायद्याची भीती बाळगण्याची किंवा हिंसक निदर्शने करण्याची आवश्यकता नाही. निदर्शन हा प्रत्येकाचा हक्क आहे, परंतु राजकीय नेते मुस्लिमांच्या भावनांचा गैरफायदा घेऊन स्वतःचे हेतू साधतात.”पुढे त्यांनी,”सीएएच्या वेळीही असेच घडले, जेव्हा मुस्लिम रस्त्यावर उतरले आणि काही वेळातच परिस्थिती हिंसक झाली. परिणामी, उत्तर प्रदेशात २७ तरुणांचा मृत्यू झाला आणि शेकडो जण तुरुंगात गेले.”असे सांगितले.

गरीब मुस्लिमांच्या कल्याणासाठी विधेयक
मौलाना बरेलवी यांनी पुढे म्हटले की, “हे दुरुस्ती विधेयक गरीब मुस्लिमांच्या हितासाठी आहे. वक्फ जमिनींच्या उत्पन्नातून गरीब मुस्लिमांची सामाजिक-आर्थिक प्रगती होईल. हे उत्पन्न शाळा, महाविद्यालये, मदरसे, रुग्णालये आणि अनाथाश्रमांसाठी वापरले जाईल, ज्यामुळे शिक्षणातील मागासलेपण दूर होण्यास मदत होईल. त्यांनी मुस्लिमांना रस्त्यावर न उतरण्याचे आणि शांततेने आपले मत मांडण्याचे आवाहन केले.

धार्मिक स्थळांना धोका नाही Maulana Barelvi ।
मौलाना बरेलवी यांनी स्पष्ट केले की, वक्फ कायद्यामुळे मशिदी, मदरसे, ईदगाह, कब्रस्तान किंवा दर्ग्यांना कोणताही धोका नाही. ही धार्मिक स्थळे जैसे थे राहतील आणि सरकार त्यात हस्तक्षेप करू शकणार नाही. काही राजकीय लोक स्वार्थासाठी मुस्लिमांची दिशाभूल करत आहेत. त्यांनी मुस्लिमांना सावध राहून या फसवणुकीला बळी न पडण्याचे आवाहन केले.