Gurnoor Brar Bouncer : धक्कादायक! मॅट हेन्रीचा घातक बाऊन्सर थेट गुरनूर ब्रारच्या छातीवर आदळला अन् सामना थांबला, पाहा पुढे काय घडलं?
Gurnoor Brar Bouncer : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात मॅट हेन्रीचा वेगवान बाऊन्सर थेट गुरनूर ब्रारच्या छातीवर लागला, ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Matt Henry’s sharp bouncer hits Gurnoor Brar Video Viral : भारत आणि न्यूझीलंडमधील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना क्राइस्टचर्च येथे सुरू आहे. पहिल्या डावात भारतीय फलंदाजांचा मोठा फ्लॉप शो पाहायला मिळाला. मात्र, तळाच्या फळीत ध्रुव जुरेलने आधी आकाश दीप आणि नंतर गुरनूर ब्रारसोबत महत्त्वपूर्ण भागीदारी करत डाव सावरला. यादरम्यान, मॅट हेन्रीचा एक वेगवान बाऊन्सर थेट गुरनूर ब्रारच्या छातीवर आदळला. या थरारक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
७२ व्या षटकात सामना थांबला, तरीही गुरनूरची झुंजार खेळी –
ध्रुव जुरेल आणि आकाश दीपने भारताला अडचणीतून बाहेर काढले होते. आकाश दीप वेगवान २९ धावा करून बाद झाल्यानंतर जुरेल व ब्रारने डाव सावरला. ७२ वे षटक टाकण्यासाठी आलेल्या मॅट हेन्रीने डावखुऱ्या गुरनूर ब्रारविरुद्ध ‘राऊंड द विकेट’ मारा करत पहिलाच बाऊन्सर टाकला, जो त्याच्या छातीवर धडकला. काही मिनिटे खेळ थांबवून फिजिओला बोलवावे लागले. तरीही ब्रारने पुन्हा मैदानात उभे राहत ४६ चेंडूंत मौल्यवान १० धावा जोडल्या.
भारतीय फलंदाजांची निराशा, ध्रुव जुरेलची एकाकी झुंज –
Gurnoor Brar Got Hit by Matt Henry 💀🔥
– His unnecessary aggression was answered with action, not words. 🤬 https://t.co/HnPGOwboPD
— Mukku (@Cric_Mukku) November 29, 2026
न्यूझीलंडचा पहिला डाव ३५६ धावांवर आटोपल्यानंतर भारताकडे मोठी धावसंख्या उभारण्याची नामी संधी होती; परंतु फलंदाजांना तिचा फायदा घेता आला नाही. ध्रुव जुरेलचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. यशस्वी जैस्वाल शून्यावर, के. एल. राहुल २५, देवदत्त पडिक्कल २१, शुबमन गिल १७, ऋषभ पंत २३ आणि वॉशिंग्टन सुंदर १० धावांवर बाद झाले. शेवटी जुरेलने झुंजार अर्धशतक ठोकून भारताची लाज राखली.
ब्लंडेल-लॅथमच्या जोरावर न्यूझीलंडच्या पहिल्या डावात ३५६ धावा
MATT HENRY’S BOUNCER TO GURNOOR BRAR! THAT WAS A SCARY DELIVERY! 🤯🔥 https://t.co/diQTuiBgBW
— VARAHA WARRIOR (@VarahaWarrior) November 29, 2026
तत्पूर्वी, क्राइस्टचर्चच्या मैदानावर या दुसऱ्या कसोटीत न्यूझीलंडला प्रथम फलंदाजीचे निमंत्रण देण्यात आले होते. किवी संघाकडून पहिल्या डावात टॉम ब्लंडेलने सर्वाधिक ८९ धावांची दमदार खेळी साकारली, तर कर्णधार टॉम लॅथमने ५९ धावांचे महत्त्वपूर्ण अर्धशतक झळकावले. याशिवाय ग्लेन फिलिप्सने ३६, डेव्हॉन कॉनव्हेने ३१, डॅरिल मिचेलने ३१ आणि हेन्री निकोल्सने १६ धावांचे मोलाचे योगदान दिले. या सांघिक कामगिरीच्या जोरावर न्यूझीलंडचा पहिला डाव ३५६ धावांवर आटोपला.





